प्रसिद्ध अभिनेत्री Yami Gautam ने चाहत्यांना दिली मोठी गुड न्यूज!

Yami Gautam | ‘विकी डोनर’ या चित्रपटापासून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam) आपल्या चाहत्यांना मोठी खुशखबर दिली आहे. यामीने 2021 मध्ये फिल्ममेकर आदित्य धरसोबत (Aditya Dhar) विवाह केला. लग्नाच्या तीन वर्षांनंतर यामी आता आई बनणार आहे.

याबाबत आदित्य आणि यामी यांनी अधिकृतपणे अशी कोणतीच घोषणा केली नाही. मात्र काही रिपोर्टनुसार ती लवकरच बाळाला जन्म देणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

Yami Gautam बनणार आई?

नुकतीच यामी (Yami Gautam) पती आदित्यसोबत स्पॉट झाली होती. तेव्हा ती तिचा बेबी बंप लपवतानाही दिसली होती. तिने स्कार्फने आपले पोट लपवले होते. यामी लवकरच तिच्या थ्रिलर फिल्मचं प्रमोशन करणार आहे. त्यामुळे ही बातमी लवकरच ती सर्वांना सांगणार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘आर्टिकल 370’ मध्ये यामी दिसणार आहे. यात ती मुख्य भुमिकेत असून तिचा पती आदित्यने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला. यावेळीही यामी बेबी बंप लपवण्यासाठी लाँग कोर्ट घालून आली होती. या दरम्यान दोघेही अत्यंत आनंदी दिसून आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

यामी आणि आदित्य यांच्यात ‘उरी’ चित्रपटादरम्यान ओळख झाली होती. याच दरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. त्यांनी कोरोना काळ संपल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. आता यामी आणि आदित्य लवकरच आई-बाबा बनणार असल्याच्या चर्चा होत आहेत.

‘या’ चित्रपटात दिसणार यामी गौतम

‘आर्टिकल 370’ या चित्रपटाचा ट्रेलर आज (8 फेब्रुवारी) रिलीज झाला आहे. याचा ट्रेलर चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. चित्रपटासाठी यामी (Yami Gautam) जोरदार प्रमोशनही करत आहे. येत्या 23 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार, यामी आणि आदित्य चित्रपटाचे प्रमोशन सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या प्रेग्नन्सीची घोषणा करणार असल्याचे म्हटले जातेय.

News Title : Yami Gautam pregnancy news viral

महत्त्वाच्या बातम्या-

Axis बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

मोठी गुड न्यूज! ‘या’ आठवड्यात स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Post Office ची भन्नाट योजना; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई

प्रेपोज डे शायरी 2024: प्रिय व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी रोमँटिक शायरी आणि कविता

‘हसीना मला माझ्या…’; पत्नीबाबत मोहम्मद शमी पहिल्यांदाच बोलला