Axis बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Axis Bank FD |  2024 हे वर्ष अर्थिकदृष्ट्या सकारात्मक आहे. याचा फायदा देशातील नागरिकांना होताना दिसत आहे. अशातच अॅक्सिस बँकेच्या एफडी व्याजदरामध्ये (Axis Bank FD) चांगली वाढ होणार आहे. यामुळे अॅक्सिस बँक गुंतवणूकदारांना याचा चांगला फायदा होणार आहे. 2 कोटींपेक्षा सामान्य गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त 7.20 टक्के व्याज आहे. तसेच ज्येष्ठ गुंतवणूकदार म्हणजेच 65 वयाहून अधिक गुंतवणूकदारांना 7.85 टक्के व्याज मिळेल. नवीन व्याजदर 5 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत.

17 महिन्यांच्या एफडीवर 18 महिन्यापेक्षा कमी कालावधीच्या व्याजदरामध्ये 10 बेस पाँईंट्सची वाढ होणार आहे. यानंतर सामान्य गुंतवणूकदारांना या एफडीवर 7.20 टक्के व्याज दिले जात आहे. हेच व्याज आधी 7.10 टक्के होते. त्याच वेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज 7.75 टक्क्यांवरून 7.85 टक्के झाले आहे. सामान्य गुंतवणूकदारांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर 3% ते 7.20% पर्यंत व्याजदर दिलं जात आहे.

अॅक्सिस बँक एफडीवर 7 ते 60 दिवसांचा कालावधी आणि व्याजदर

अॅक्सिस बँक एफडीवर 7 ते 60 दिवसांच्या व्याजदराची टक्केवारी पुढीलप्रमाणे दिली आहे.

7 ते 29 दिवसांच्या कालावधीमध्ये टक्केवारी ही 3 टक्के आहे.

30 ते 45  दिवसांसाठी एफडीची गुंतवणूक केल्यानं गुंतवणूकदारांना 4.25 टक्के व्याजदराला लाभ घेता येणार आहे.

61 दिवसांपासून ते एक वर्ष एफडी व्याजदर

61 दिवसांपासून ते 3 महिन्यांपेक्षा कमी एफडी कालावाधीसाठी 4.50 टक्के व्याजदर आहे.

3 महिन्यांपासून ते 6 महिन्यांपेक्षा कमी कालावाधीसाठी 4.75 टक्के व्याजदर आहे.

6 महिन्यांपासून ते 9 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.75 टक्के व्याजदर आहे.

9 महिने ते एक वर्षाच्या एफडी कालावधीसाठी 6 टक्के व्याजदर आहे.

1 वर्षापासून ते 10 वर्षांसाठी एफडी व्याजदर 

1 वर्षापासून ते 15 महिन्यांपेक्षा कमी एफडी कालावधीसाठी 6.70 टक्के व्याजदर आहे.

15 महिन्यांपासून ते 17 महिन्यांपेक्षा कमी एफडी कालावधीसाठी 7.10 टक्के व्याजदर आहे.

17 महिन्यांपेक्षा जास्त ते 18 महिन्यांपेक्षा कमी एफडी कालावधीसाठी 7.20 टक्के व्याजदर आहे.

18 महिने ते 5 वर्षांपेक्षा कमी एफडी कालावधीसाठी 7.10 टक्के व्याजदर आहे.

5 ते 10 वर्षे  एफडी कालावधीसाठी 7.00 टक्के व्याजदर आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी अॅक्सिस बँककडून अतिरिक्त व्याजदर

अॅक्सिस बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त व्याजदर दिलं जातं. या बँकेत ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्के ते 7.85 टक्के व्याजदर दिलं जात आहे.

News Title – Axis Bank FD rates Growth

महत्त्वाच्या बातम्या