आज मी आणखीच श्रीमंत झालो; 12th नापास IPS अधिकाऱ्याच्या भेटीने आनंद महिंद्रा भारावले

Anand Mahindra | 12th Fail चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घालण्यात यश मिळवले. नुकताच OTT वर 12th Fail नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात विक्रांत मेसी आणि मेधा शंकर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी केली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळाले. हा चित्रपट एका आयपीएस अधिकाऱ्याच्या संघर्षमय प्रवासावर आधारित आहे.

12th Fail हा चित्रपट IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि त्यांची IRS पत्नी श्रद्धा जोशी यांची प्रेमकहाणी, संघर्ष आणि एकमेकांना दिलेली साथ सांगणारा आहे. देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर दोन अधिकाऱ्यांसोबतच्या त्यांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे.

12th फेल चित्रपटाची प्रेक्षकांना भुरळ

या फोटोसोबत त्यांनी एक भावनिक संदेशही लिहिला आहे. देशातील जास्तीत जास्त लोकांचे असेच विचार असले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे. आनंद महिंद्रा यांनी दोघांमधील भेटीचा फोटो शेअर करत म्हटले, “जेव्हा मी या दोघांकडून ऑटोग्राफ मागितले तेव्हा ते लाजले, ज्याला मी अभिमानाने पाहतो.”

तसेच मनोज कुमार शर्मा IPS आणि त्यांची पत्नी श्रद्धा जोशी IRS ही लोक खऱ्या जीवनातील हिरो आहेत. एक असाधारण जोडपे ज्यांच्या जीवनावर 12 वी फेल हा चित्रपट बनला आहे. आज त्यांच्यासोबतच्या जेवणावेळी मला कळले की चित्रपटाची कथा त्यांच्या खऱ्या जीवनकथेशी तंतोतंत जुळते आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

Anand Mahindra भारावले

आनंद महिंद्रा आणखी म्हणाले की, आजही मनोज शर्मा आणि श्रद्धा हे प्रामाणिकपणे जीवन जगण्याच्या त्यांच्या तत्त्वज्ञानाचे पालन करत आहेत. जर भारताला जागतिक महासत्ता बनवायचे असेल तर अधिकाधिक लोकांनी त्यांची जीवनशैली अंगीकारली तर तमाम भारतीयांचे महासत्ता बनण्याचे स्वप्न लवकर साकार होईल.

आनंद महिंदा यांच्या म्हणण्यानुसार, मनोज आणि श्रद्धा ही मंडळी आपल्या देशाचे खरे सेलिब्रिटी आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. ते म्हणाले की, या दोघांना भेटून मी आज आणखीच श्रीमंत झालो आहे, अशा आशयाची पोस्ट आनंद महिंद्रा यांनी केली आहे.

News Title- Industrialist Anand Mahindra meets IPS Manoj Kumar Sharma, whose life the movie 12th Fail is based on, and his wife Shraddha Joshi IRS
महत्त्वाच्या बातम्या –

पूनम पांडेवर सरकार मोठी जबाबदारी सोपवणार? आरोग्य मंत्रालयाने दिली अपडेट

पंतप्रधान मोदींचे एक भाषण आणि सरकारी शेअर्स सुसाट; 24 लाख कोटींची कमाई

नॉट रिचेबल किशन सापडला! टीम इंडियातून सुट्टी अन् ‘या’ 2 खेळाडूंसोबत सराव

शिक्षकांना शिकवण्याची नाही तर केवळ ‘या’ गोष्टीची काळजी; उच्च न्यायालयाने फटकारले

‘हा’ खेळाडू पुन्हा होणार पाकिस्तानचा कर्णधार!