नॉट रिचेबल किशन सापडला! टीम इंडियातून सुट्टी अन् ‘या’ 2 खेळाडूंसोबत सराव

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ishan Kishan | टीम इंडिया सध्या मायदेशात इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मागील वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा संघाचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन या दौऱ्यावरून अचानक परतला आणि तेव्हापासून तो भारतीय संघाबाहेर आहे. टीम इंडियाचे व्यवस्थापन आणि इशान किशन यांच्यामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी देखील इशान किशनबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या

पण, इशान आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. भारतीय संघाबाहेर असलेला किशन त्याच्या दोन सहकारी खेळाडूंसोबत सराव करत आहे. आता तो देखील हार्दिक पांड्याप्रमाणे थेट आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. नॉट रिचेबल इशान किशनचा बऱ्याच दिवसांपासून शोध घेतला जात होता.

नॉट रिचेबल किशन सापडला!

कारण जेव्हापासून तो टीम इंडियातून बाहेर झाला आहे तेव्हापासून तो कधीच माध्यमांसमोर आला नाही. किंबहुना सोशल मीडियावर देखील तो सक्रिय दिसला नाही. मात्र, इशान किशन आयपीएलची तयारी करत असून पांड्या बंधूंसोबत बडोद्यात आहे. ‘क्रिकबझ’च्या रिपोर्टनुसार, इशान किशन सध्या बडोद्यात हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्यासोबत सराव करत आहे. आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी इशान किशन सराव करत आहे. मात्र त्याने याबाबत कोणालाच माहिती दिलेली नाही.

दरम्यान, किशनला टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल, असे राहुल द्रविड यांनी सांगितले होते. त्यानंतर इशान किशन रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये दिसेल असे अपेक्षित होते पण तसे काही झाले नाही. इशान किशनचे पुनरागमन केवळ त्याच्यावरच अवलंबून असल्याचेही द्रविड यांनी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत इशान किशनच्या वृत्तीवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते.

Ishan Kishan अन् पांड्या बंधू

इशान किशन बडोद्याच्या किरण मोरे अकादमीमध्ये सराव करत असून पांड्या ब्रदर्ससोबत आयपीएलची तयारी करत आहे. इशान किशनने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून एकही सामना खेळला नाही, तो विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यात टीम इंडियाचा भाग होता. इशान आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग आहे. हार्दिक पांड्याकडे मुंबईच्या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

इशान किशन देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास वारंवार नकार देत आहे, अशा परिस्थितीत आता बीसीसीआय त्याला आपल्या कराराचा भाग बनवणार की नाही हे पाहण्याजोगे असेल. कारण तो बराच काळ संघापासून दूर आहे आणि देशांतर्गत क्रिकेटकडेही लक्ष देत नाही. सध्या इशान किशन टीम इंडियाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या सी श्रेणीत आहे.

News Title- Team India’s Ishan Kishan practices with Hardik Pandya and Krunal Pandya in Baroda, Gujarat for IPL
महत्त्वाच्या बातम्या –

‘हा’ खेळाडू पुन्हा होणार पाकिस्तानचा कर्णधार!

पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अमोल मिटकरींची मोठी घोषणा, आता…

अभिषेक बच्चनच्या वाढदिवसादिवशी बहिणीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली…

मोठी बातमी! देशातील ‘या’ स्टेडियमचं नाव बदलणार

रोहित शर्मा का घेत नाही मुंबई इंडियन्ससोबत वाकडं?, मोठं कारण आलं समोर