‘हा’ खेळाडू पुन्हा होणार पाकिस्तानचा कर्णधार!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Babar Azam |  पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार बाबर आझमबाबत (Babar Azam) एक मोठी बातमी समोर आली आहे. बाबर आझम पुन्हा एकदा पाकिस्तान संघाचा कर्णधार होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबतची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं दिली आहे.

पाकिस्तान बोर्ड कधी कोणता निर्णय घेईल हे सांगता येत नाही. टीम इंडियासोबत वनडे विश्वचषकामध्ये पराभव झाल्यानंतर बाबर आझमला कर्णधारपदावरून काढण्यात आलं. यामुळे बाबर आझम अडचणीत आला होता. त्यानंतर बाबरच्याऐवजी मर्यादीत षटकांचा कर्णधार म्हणून शाहिन आफ्रिदीला निवडण्यात आलं. त्यानंतर शान मसदूला कसोटी संघाचा कर्णधारपद देण्यात आलं. मात्र काहीही बदल झाला नाही.

‘जैसे थे’ परिस्थिती

बाबरचं कर्णधारपद काढण्यात आल्यानंतर पाकिस्तान संघ चांगली कामगिरी करेल असं वाटत होतं. दुसऱ्या खेळाडूंना कर्णधारपद दिलं तरीही संघामध्ये कोणताच फरक नाही, संघाची जैसे थे परिस्थिती पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलिया मालिकेमध्ये 3-0 अशी पाकिस्तान संघाची स्थिती होती. त्यानंतर  न्यूझीलंडसोबत 4-1 असा पराभव स्विकारावा लागला आहे.

पाकिस्तान क्रिकेटच्या सानिध्यात असलेल्या आणि क्रिकेटची जाण असलेल्या सूत्रांकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं बाबर आझमच्या कर्णधारबाबत यू टर्न दाखवला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली आहे.

पाकिस्तान बोर्डाचे चेअरमन मोहसिन नक्वी हे आता पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये मोठा बदल करणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र यावर अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. बाबर आझमला पुन्हा एकदा पाकिस्तान संघामध्ये कर्णधारपद देणारी बातमी असू शकते.

बाबरचं कर्णधारपद गुलदस्त्यात

पाकिस्तान संघ हा सध्या इंग्लंडविरूद्ध 4 टी 20 सामने खेळणार आहे. त्यानंतर संघ टी 20 विश्वचषक खेळण्यासाठी वेस्ट इंडीजला जाणार आहे. मात्र यावेळी बाबर आझम कर्णधारपदाची भूमिका बजावेल का? हे अद्यापही स्पष्ट झालं नसून गुलदस्त्यात आहे.

News Title – Babar Azam Once Again captain?

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं नाव

सीमा हैदरची राजकारणात एन्ट्री?; ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर

अजित पवारांचं ठरलंय, ‘या’ बड्या नेत्याला पाडणार म्हणजे पाडणारच; पवार कुटुंबातील व्यक्ती मैदानात

“आम्हाला भीती नाही, आमच्याकडे…”, रोहित पवारांनी अजित पवारांना सुनावलं

‘तुम्हाला निर्मात्यासोबत झोपावं लागेल…;’ Ankita Lokhande ने सांगितला कास्टिंग काऊचचा प्रकार