‘तुम्हाला निर्मात्यासोबत झोपावं लागेल…;’ Ankita Lokhande ने सांगितला कास्टिंग काऊचचा प्रकार

Ankita Lokhande | प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ‘बिग बॉस 17’ मुळे चर्चेत होती. हा शो आता संपला आहे. मूनव्वर फारूकीने बाजी मारत बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. अंकिता आणि तिचा पती विकी जैन दोघेही बिग बॉसमध्ये सामील झाले होते. या शोमध्ये दोघांत प्रचंड भांडण झाली होती. अंकिता सतत काही न काही कारणांमुळे बिग बॉसच्या घरात चर्चेत असायची. मात्र आता तिने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे.

यामुळे अंकिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिच्यासोबत एक धक्कादायक गोष्ट घडली होती. एका प्रसिद्ध अभिनेत्याने अंकिताकडे शारीरिक सुखाची मागणी केली असल्याचं तिने म्हटलं आहे. अंकिताच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा

वयाच्या 20 व्या वर्षी अंकिताला (Ankita Lokhande ) कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. एका साउथ सिनेमाच्या ऑडिशनदरम्यान अंकितासोबत ही घटना घडली. त्यावेळी मी खूप सावध होती आणि मी एकटीच होती. मी तेव्हा 20 वर्षांची असेल. मी त्यांना विचारलं, निर्मात्यांसोबत कोणत्या गोष्टीसाठी तडजोड करावी लागेल. त्यांना पार्टी किंवा डिनरसाठी जायचं आहे का?, असे प्रश्न मी केले.

या प्रसंगी त्यांना नेमकं काय हवं हे मला कळलं होतं. पण मला त्यांच्या तोंडून ऐकायचं होतं. मी त्यांना म्हणाली, ‘तुमच्या दिग्दर्शकांना शारीरिक संबंधांसाठी मुलगी हवी आहे. काम करण्यासाठी त्यांनी एक उत्तम अभिनेत्री नकोय. असे ठामपणे बोलून अंकिता तिथून निघून गेली, असा धक्कादायक खुलासा अंकिताने केला आहे.

नंतर या दिग्दर्शकांनी माझी माफीही मागितली. पण, मी त्यांना काम करण्यास नकार दिल्याचे अंकिताने सांगितले. एवढेच नाही, तर अंकिता सोबत अजून एक घटना काहीशी अशीच घडली. “याठिकाणी मी त्या अभिनेत्याचं नाव घेणार नाही. कारण तो अभिनेता प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. तेव्हा देखील गोष्ट कॉम्प्रोमाइजवर येऊन थांबेल असं मला वाटलं होतं.”, असे अंकिता म्हणाली आहे. त्यामुळे सध्या अंकिताच्या या वक्तव्याचीच चर्चा होत आहे.

अंकिताच्या वक्तव्याची चर्चा

अंकिताने (Ankita Lokhande ) आपल्या फिल्मी करीअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुण केली आहे. ती ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत झळकली होती. यातील ‘अर्चना’ च्या भूमिकेने तिला प्रसिद्धी दिली. पुढे तिने सिनेमात काम करुं आपली नवी ओळख निर्माण केली. अंकिताने बाघी 3,मणिकर्णिका, स्मार्ट जोडी, स्वातंत्र्य वीर सावरकर अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.

News Title- Ankita Lokhande faced the casting couch

महत्त्वाच्या बातम्या –

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

‘…हे चुकीचं आहे’; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य

“काकांनी उभा केलेला पक्ष हिसकावणं सोप्प आहे पण…”

कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर!; संभाजीराजे छत्रपती नॉट रीचेबल

इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे गोंधळले, दिलं भलतंच उत्तर