कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर!; संभाजीराजे छत्रपती नॉट रीचेबल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sambhajiraje Chhatrapati | लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्यापुर्वीच राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटासह विरोधी पक्षाकडूनही यासाठी रणनीती आखली जात आहे. अशातच आता कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. माजी खासदार संभाजीराजे भोसले (Sambhajiraje Chhatrapati) मागच्या 5 दिवसांपासून नॉट रीचेबल असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संभाजीराजे यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन होणार होतं, मात्र अचानक त्यांनी आपले सर्व दौरे रद्द केल्याने एकच चर्चा रंगत आहेत. त्यांनी 2 फेब्रुवारीरोजी केलेली एक पोस्टही या कारणाने आता व्हायरल होत आहे.

संभाजीराजे लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखणार?

काही कारणास्तव उद्यापासूनचे सर्व नियोजित कार्यक्रम व दौरे रद्द करण्यात आलेले आहेत. क्षमस्व!, असं ट्वीट संभाजीराजे यांनी केलं होतं. त्यानंतर संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati ) नॉट रीचेबल आहेत. ते नेमके कुठे आहेत, याबाबत त्यांच्या कुटुंबियांना देखील काहीच खबर नाही. त्यामुळे राजकारणात याच्या चर्चा होत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चाचपाणी करत असल्याचं म्हटलं जात आहे. यासाठी ते दौऱ्यात व्यस्त असल्याचे म्हटलं जातंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून त्यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांचं नाव घेतलं जात आहे. त्यामुळे कोल्हापूरसाठी त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. म्हणूनच संभाजीराजे नॉट रीचेबल आहेत.

संभाजीराजे आपली भूमिका स्पष्ट करणार?

आता सांभाजीराजे यांची राजकीय भूमिका नेमकी काय, याबाबत बोललं जात आहे. मागे त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचं भविष्य हे स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

त्यामुळे यंदा संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) आपला स्वतःचा पक्ष स्वराज्य पक्षासाठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी काय रणनीती आखली असणार, याकडेही सर्वांच्या नजरा असणार आहेत. येत्या 11 फेब्रुवारी रोजी संभाजीराजे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी जोरदार त्याराई तयारी केली आहे. आता या कार्यक्रमात संभाजीराजे उपस्थित असणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

News Title- Sambhajiraje Chhatrapati not reachable 

महत्त्वाच्या बातम्या –

“हे आधीच पाहिलंय”, मास्टर ब्लास्टर आणि बीडचा ‘सचिन’, IPL फ्रँचायझीकडून खास कौतुक!

लग्नाचे आमिष दाखवले! महिला खेळाडूसोबत शरीरसंबंध; भारताच्या हॉकीपटूवर बलात्काराचा गुन्हा

ईशा देओल आणि भरत तख्तानी झाले विभक्त; लग्नाच्या 11 वर्षानंतर घटस्फोट, कारणही सांगितलं

Education | आंदोलन केल्यास नोकरी जाऊ शकते; नोकरदार शिक्षकांना सरकारचा गंभीर इशारा

बीडचा ‘सचिन’ चमकला! मराठमोळ्या खेळाडूच्या जोरावर भारताची युवा ब्रिगेड वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये