“काकांनी उभा केलेला पक्ष हिसकावणं सोप्प आहे पण…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

NCP Crisis | राज्यात मोठा राजकीय स्फोट झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचाही ‘शिवसेना’सारखाच खेळ खंडोबा झाला आहे. अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी (NCP Crisis) असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावरूनच आता मनसेने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत टोलेबाजी केली आहे.

पक्ष संस्थापकालाच राष्ट्रवादीतून बाहेर पाडण्याच्या या निकालावर एकच चर्चा रंगत आहे. विरोधी पक्षाकडून या निर्णयावर संताप व्यक्त केला जात आहे. यावरूनच मनसेने एक व्हिडीओ पोस्ट करत अजित पवारांना डिवचलं आहे. राज ठाकरे यांचा हा व्हिडीओ रत्नागिरीमधील सभेचा आहे.

“बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता..”

“बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर (NCP Crisis) हिसकावणं सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी ‘राज ठाकरे’ यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते…असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ !”, असा टोला मनसेनी अजित पवार यांना लगावला आहे.

‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला पटेल का?, असा खोचक सवालही यावेळी मनसेने केला आहे. शिवसेना पक्ष आता एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे, काहीशी अशीच गत राष्ट्रवादीचीही झाली आहे. त्यामुळे सर्वत्र या निर्णयावर टीका होत आहे.

शरद पवारांना आज दुपारपर्यंत संधी

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा (NCP Crisis) हा निर्णय शिवसेना पक्षाच्या निकालाआधारे दिला आहे. आमदारांची संख्याबळ ही अजित पवार गटाची अधिक असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. यामुळे आता पक्ष आणि चिन्हाचे दावेदार हे अजित पवार आहेत. तसेच शरद पवार यांचा वेगळा गट असावा नाहीतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा निकाल निवडणूक आयोगानं दिला आहे.

आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे सूचवण्याचा पर्याय दिला आहे. यासाठी आज (7 फेब्रुवारी) दुपारपर्यंत म्हणजेच 3 वाजेपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आजच शरद पवारांना पक्षाचं नाव आणि चिन्ह याची माहिती आयोगाला द्यावी लागणार आहे.

News Title- NCP Crisis MNS criticism of Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या –

77 वर्षीय वृद्धाची 22 वर्षीय तरुणीसोबत INSTA वर मैत्री; बंगल्यावर हत्या, आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात

“हे आधीच पाहिलंय”, मास्टर ब्लास्टर आणि बीडचा ‘सचिन’, IPL फ्रँचायझीकडून खास कौतुक!

लग्नाचे आमिष दाखवले! महिला खेळाडूसोबत शरीरसंबंध; भारताच्या हॉकीपटूवर बलात्काराचा गुन्हा

ईशा देओल आणि भरत तख्तानी झाले विभक्त; लग्नाच्या 11 वर्षानंतर घटस्फोट, कारणही सांगितलं

Education | आंदोलन केल्यास नोकरी जाऊ शकते; नोकरदार शिक्षकांना सरकारचा गंभीर इशारा