77 वर्षीय वृद्धाला 22 वर्षीय तरुणीसोबत मैत्री पडली महागात; बंगल्यावर घडलं भयंकर कांड

Crime News | मैत्री अन् हत्या अंगावर काटा आणणारी घटना गोव्यात घडली. गोव्यातील 77 वर्षीय वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्धाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी क्राइम ब्रँचच्या पथकाने 22 वर्षीय तरुणी आणि तिच्या 32 वर्षीय प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून अंदाजे 47 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नरोत्तम ढिल्लो असे मृत वृद्धाचे नाव आहे. उत्तर गोव्यातील पोर्वरीम येथील बंगल्यात त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी सांगितले की, त्यांना रस्त्याने कारमधून दोन जण येताना दिसले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. चौकशीत हत्येची बाब उघडकीस आली.

आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात

मुंबई पोलिसांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधून आरोपींबद्दल माहिती दिली आहे. लवकरच त्यांना गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल. आरोपींविरुद्ध गोव्यातील पोर्वरीम पोलीस ठाण्यात यापूर्वीच हत्या आणि लुटमारीचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, गोवा-मुंबई महामार्गावरून नंबर प्लेट नसलेले एक वाहन मुंबईच्या दिशेने जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी सांगितले की, त्यांना एका फॉर्च्युनर कारमधून दोन जण रस्त्याने येताना दिसले. त्यांची चौकशी केली असता ते उत्तर देताना गडबडले मग संशय बळावला. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

Crime News INSTA वर मैत्री अन्…

चौकशीदरम्यान कारमध्ये असलेल्या तरुणीने सांगितले की, तिची इन्स्टाग्रामवर गोव्यात राहणाऱ्या निम्स नावाच्या 77 वर्षीय व्यक्तीसोबत ओळख झाली होती. निम्स यांनी तिला इन्स्टाग्रामवरच मेसेज करून गोव्यात येऊन बंगल्यात राहण्याचे आमंत्रण दिले होते. यानंतर ती तिच्या दोन मित्रांसोबत गोव्यात गेली.

ती गोव्यात एका वृद्ध व्यक्तीला भेटली आणि त्याने तिला त्याच्या फॉर्च्युनर कारमधून त्याच्या बंगल्यात नेले. आरोपी मुलीने दावा केला की, निम्सने रात्री तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यादरम्यान त्यांच्यात मारामारी झाली, त्यात निम्स या वृद्धाचा मृत्यू झाला. वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर तरुणी आणि तिच्या दोन मित्रांनी तिथून फॉर्च्युनर कार घेऊन पळ काढला. पोलीस पकडतील या भीतीने तिचा एक साथीदार आधीच गाडीतून खाली उतरून पळून गेला. तर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी मोबाईल, गळ्यातील साखळी आणि सोन्याचे ब्रेसलेट घेऊन पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे.

News Title- Mumbai Police has arrested a 22-year-old woman and her 32-year-old boyfriend in connection with the murder of a 77-year-old man in Goa
महत्त्वाच्या बातम्या –

“हे आधीच पाहिलंय”, मास्टर ब्लास्टर आणि बीडचा ‘सचिन’, IPL फ्रँचायझीकडून खास कौतुक!

लग्नाचे आमिष दाखवले! महिला खेळाडूसोबत शरीरसंबंध; भारताच्या हॉकीपटूवर बलात्काराचा गुन्हा

ईशा देओल आणि भरत तख्तानी झाले विभक्त; लग्नाच्या 11 वर्षानंतर घटस्फोट, कारणही सांगितलं

Education | आंदोलन केल्यास नोकरी जाऊ शकते; नोकरदार शिक्षकांना सरकारचा गंभीर इशारा

बीडचा ‘सचिन’ चमकला! मराठमोळ्या खेळाडूच्या जोरावर भारताची युवा ब्रिगेड वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये