मुंबईतील CSMT रेल्वे स्थानकात चोरी; स्वच्छतागृहातील 12 लाख रुपयांचे साहित्य लंपास

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

CSMT Station | सोशल मीडियाच्या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अनोखा प्रकार राज्यातील प्रतिष्ठित रेल्वे स्थानकातून समोर आला आहे. इथे रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतागृहातून मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. (Theft News In Mumbai) चोरीच्या मालाची किंमत लाखोंच्या घरात असल्याची माहिती आहे. आतापर्यंत या पातळीवर चोरी झाल्याचे उघडकीस आले नव्हते.

12 लाख रुपयांचे साहित्य लंपास

मात्र, या घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे कोणाचे काम आहे याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. खरं तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे चोरीची एक अनोखी घटना घडली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच बांधण्यात आलेल्या एसी टॉयलेटसह, रनिंग रूम आणि सार्वजनिक शौचालयांमधून 12 लाख रुपयांचे साहित्य गायब झाले आहे.

माहितीनुसार, 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी जेट स्प्रे, टॉयलेट सीट कव्हर, टॅप, बॉटल होल्डर आणि स्टॉपकॉक्स समाविष्ट असलेल्या सुमारे 70 गोष्टी लंपास केल्या आहेत. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे एका आतल्या व्यक्तीचे काम असल्याचे दिसते, कारण केवळ याच कर्मचाऱ्यांनाच इथपर्यंत पोहोचता येते.

CSMT Station मध्ये चोरीची घटना

तसेच कंत्राटदार कामगार कर्मचाऱ्यांचा देखील या चोरीच्या कामात सहभागी असू शकतो. स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे ओळख पटवणे कठीण होत आहे. प्रत्येक जेट स्प्रेची किंमत 1600 रुपये असून चोरलेल्या 12 वस्तूंची किंमत 19 हजार 200 रुपये असल्याची माहिती आहे.

 

याशिवाय 28 हजार 716 रुपये किमतीची 6 पिलक कॉक्स देखील गायब आहेत. विशेष बाब म्हणजे 4 जानेवारीलाच एसी टॉयलेट प्रवाशांसाठी खुले करण्यात आले होते. देशभरात ज्या रेल्वे स्थानकातून रेल्वेची ये-जा होते तिथेच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली. अधिकाऱ्यांनी चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, या प्रकरणी कोणावर आणि काय कारवाई होते हे पाहण्याजोगे असणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मुंबईतील सर्वात मोठे स्थानक असून इथूनच देशभरात रेल्वे गाड्या सोडल्या जातात.

News Title- CSMT railway station in Mumbai has been stolen and toilet material worth Rs 12 lakh has been looted
महत्त्वाच्या बातम्या –

77 वर्षीय वृद्धाची 22 वर्षीय तरुणीसोबत INSTA वर मैत्री; बंगल्यावर हत्या, आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात

“हे आधीच पाहिलंय”, मास्टर ब्लास्टर आणि बीडचा ‘सचिन’, IPL फ्रँचायझीकडून खास कौतुक!

लग्नाचे आमिष दाखवले! महिला खेळाडूसोबत शरीरसंबंध; भारताच्या हॉकीपटूवर बलात्काराचा गुन्हा

ईशा देओल आणि भरत तख्तानी झाले विभक्त; लग्नाच्या 11 वर्षानंतर घटस्फोट, कारणही सांगितलं

Education | आंदोलन केल्यास नोकरी जाऊ शकते; नोकरदार शिक्षकांना सरकारचा गंभीर इशारा