“हे आधीच पाहिलंय”, मास्टर ब्लास्टर आणि बीडचा ‘सचिन’, IPL फ्रँचायझीकडून खास कौतुक!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sachin Dhas | अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात कहर माजवणाऱ्या सचिन दासचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मराठमोळ्या सचिन दासने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या या खेळीची तुलना सचिन तेंडुलकरच्या खेळीशी केली जात आहे. सचिन तेंडुलकरला डोळ्यासमोर ठेवून सचिन दासच्या वडिलांनी आपल्या लेकराचे नाव ‘सचिन’ असे ठेवले. मूळचा बीडमधील असलेल्या सचिनने अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 96 धावांची खेळी केली.

2011 च्या विश्वचषकात टीम इंडियाचे इतर फलंदाज झटपट बाद होत असताना सचिन तेंडुलकरने 85 धावांची मौल्यवान खेळी केली होती हा देखील एक योगायोगच म्हणावा लागेल. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही सचिन दासने 96 धावांची अप्रतिम खेळी केली. भारताचे आघाडीचे 4 फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले असताना सचिनने मोर्चा सांभाळला.

भारताची युवा ब्रिगेड फायनलमध्ये

सचिन दासने 19 वर्षांखालील विश्वचषक उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 95 चेंडूत 96 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 1 षटकार मारला. सचिनच्या या खेळीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचे पुल शॉट्स. उसळत्या खेळपट्टीवर त्याने एकामागून एक अनेक पुल शॉट्स खेळले. सचिन दास व्हीव्हीएस लक्ष्मण आणि शुभमन गिलच्या शैलीत पुल शॉट्स खेळतो.

दुसरीकडे, आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्जने सचिन दासच्या खेळीची तुलना सचिन तेंडुलकरच्या खेळीशी केली. पंजाबच्या फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर आणि सचिन दास दिसत आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले, “सचिन वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये नेहमीच चांगला खेळतो. हे आपण यापूर्वीही पाहिले आहे.”

 

Sachin Dhas ची अप्रतिम खेळी

भारतीय संघाने 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 2 गडी राखून पराभव केला. या विजयानंतर अंडर-19 भारतीय संघाचे खूप कौतुक होत आहे. बीसीसीआयसह भारताच्या पुरूष संघातील आजी माजी खेळाडूंनी युवा शिलेदारांच्या खेळीला दाद दिली.

भारताची युवा ब्रिगेड सलग पाचव्यांदा आयसीसी अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे. यावेळी भारताला फायनलचे तिकिट मिळवून देण्यात बीडच्या सचिन दसने मोलाची भूमिका बजावली. त्याने 96 धावांची स्फोटक खेळी करून भारतीय संघाला दडपणातून बाहेर काढले अन् विजय मिळवून दिला.

News Title- Punjab Kings shared his photo with Sachin Tendulkar after Sachin Das scored 96 against South Africa in u19 world cup 2024 semi final
महत्त्वाच्या बातम्या –

लग्नाचे आमिष दाखवले! महिला खेळाडूसोबत शरीरसंबंध; भारताच्या हॉकीपटूवर बलात्काराचा गुन्हा

ईशा देओल आणि भरत तख्तानी झाले विभक्त; लग्नाच्या 11 वर्षानंतर घटस्फोट, कारणही सांगितलं

Education | आंदोलन केल्यास नोकरी जाऊ शकते; नोकरदार शिक्षकांना सरकारचा गंभीर इशारा

बीडचा ‘सचिन’ चमकला! मराठमोळ्या खेळाडूच्या जोरावर भारताची युवा ब्रिगेड वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये

नांदेड सिटीतील रहिवाशांनी घेतली आयुक्तांची भेट, वाचा कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा