बीडचा ‘सचिन’ चमकला! मराठमोळ्या खेळाडूच्या जोरावर भारताची युवा ब्रिगेड वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

U19 World Cup 2024 | अंडर-19 विश्वचषक 2024 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला. या सामन्यात भारताच्या युवा शिलेदारांनी दक्षिण आफ्रिकेचा 2 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले. या सामन्यात एक वेळ अशी आली जेव्हा दक्षिण आफ्रिकेने मजबूत पकड बनवली होती. मात्र भारतीय कर्णधार उदय सहारन आणि मराठमोळा सचिन दास यांनी दक्षिण आफ्रिकेच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.

खरं तर रोमांचक सामन्यात प्रसिद्ध मास्टर ब्लास्टरचे नारे ऐकू आले. कारण भारताकडून सर्वाधिक 96 धावांची खेळी करणारा सचिन दास हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आपला आदर्श मानतो. तो महाराष्ट्रातील बीडमधील असून त्याच्या घरच्यांनी तेंडुलकरमुळे आपल्या मुलाचे नाव सचिन असे ठेवले आहे. सचिन दासने ऐतिहासिक खेळी करून भारताला सलग पाचव्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचवले.

बीडचा ‘सचिन’ चमकला!

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाकडून राज लिंबानीने अष्टपैलू खेळी केली. 3 बळी घेण्यासोबतच त्याने 4 चेंडूत 13 धावा करत भारताला विजय मिळवून दिला. उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारतीय शिलेदारांनी आफ्रिकन संघाला केवळ 244 धावांवर रोखले. दक्षिण आफ्रिकेकडून दोन अर्धशतकी खेळी पाहायला मिळाल्या.

पण जेव्हा भारताची फलंदाजी आली तेव्हा आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर आघाडीचे फलंदाज गारद झाले. भारताने आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी आणि मुशीर खानसारखे स्टार फलंदाज अवघ्या 25 धावांत स्वस्तात गमावले. मात्र यानंतर टीम इंडियाच्या दोन फलंदाजांसमोर आफ्रिकन गोलंदाज बळी घेण्यासाठी तरसले.

 

U19 World Cup 2024 भारत फायनलमध्ये

अंडर-19 भारतीय संघाचा फलंदाज सचिन दासने टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले. या युवा फलंदाजाने 96 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, पण दुर्दैवाने त्याचे शतक हुकले. या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकाराचाही समावेश होता. याआधी सचिन दासने नेपाळविरुद्धच्या सामन्यात स्पर्धेतील पहिले शतक झळकावले होते. उपांत्य सामन्यात दुसऱ्या टोकाला कर्णधार उदय सहारन पुन्हा एकदा संघासाठी भिडल्याचे दिसले.

उदयने 124 चेंडूत 81 धावांची खेळी पूर्ण केली. या दोन फलंदाजांमध्ये झालेल्या 175 धावांच्या मॅच-विनिंग भागीदारीमुळे भारताने या सामन्यात रोमहर्षक विजयाची नोंद केली. आफ्रिकन गोलंदाजांनी उदय-सचिन या दोन्ही फलंदाजांना बाद केले पण भारताने सलग पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

News Title- U19 World Cup 2024 Team India defeated South Africa by 2 wickets to enter the final, Beed’s Sachin Das played a brilliant knock of 96 for India
महत्त्वाच्या बातम्या –

नांदेड सिटीतील रहिवाशांनी घेतली आयुक्तांची भेट, वाचा कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा

घड्याळाचे काटे फिरले…, शरद पवारांना मोठा झटका; चिन्ह, पक्ष अजित पवारांकडेच

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

‘खूप काही चुकीचं…’; रोहित शर्माची पत्नी रितीकाच्या कमेंटने खळबळ

‘माझ्या मुलीला डॉक्टरांच्या हातात देताना….’; मुलीच्या ओपन हार्ट सर्जरीबाबत करण सिंह ग्रोवरचा मोठा खुलासा