‘तुमच्यामुळे माझी आई गेली’; गावकऱ्याने सुजय विखेंना विचारला जाब

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sujay Vikhe Patil viral video | बारामती, शिरूर, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघाप्रमाणे आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघ अधिक चर्चेचा विषय ठरला आहे. कारण या मतदारसंघामध्ये महायुतीकडून सुजय विखे (Sujay Vikhe Patil viral video) यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे नेते आणि पारनेरचे माजी आमदार निलेश लंके हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

निलेश लंके हे गावोगावी जात प्रचार करत आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे सुजय विखे देखील सभा घेताना दिसत असून गावोगावी जात लोकांशी चर्चा करत आहेत. सुजय विखे हे अहमदनगर तालुक्यातील देऊळगाव येथे गेले होते. त्यावेळी ते ग्रामस्थांशी चर्चा करत होते. त्यावेळी एका नागरिकाने सुजय विखे (Sujay Vikhe Patil viral video) यांना कोरोनाकाळात आपल्या आईच्या मृत्यूबाबत जाब विचारलाय. तुमच्यामुळेच माझी आई गेली असं या गावकऱ्याने म्हटलंय.

व्हिडीओत नेमकं काय घडलं?

अहमदनगर येथील देऊळगाव गावात विद्यमान खादसदार आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील प्रचारासाठी आले होते. तेव्हा ते नागरिकांसोबत चर्चा करत होते. यावेळी भरसभेत एका गावकऱ्याने सुजय विखे तुमच्यामुळे माझी आई कोरोनात गेली, असा जाब एका नागरिकाने सुजय विखे यांना विचारला आहे. मात्र सुजय विखे काहीच बोलले नाहीत. त्यांचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. (Sujay Vikhe Patil viral video)

दरम्यान, सुजय विखे यांचे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक मोठ मोठे हॉस्पिटल उभारण्यात आलेत. कोरोनाकाळात त्यांनी कोणाला मदत केली? असा सवाल निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलत असताना केला होता. मात्र पदवी नसतानाही 30 हजार लोकांची सेवा मी केली असल्याचं निलेश लंके म्हणाले.

सुजय विखे हे त्यांच्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात. त्यांनी काही दिवसांआधी आमची अडचण होत असेल तर तुतारी वाजवून टाका असं वक्तव्य केलं होतं. मात्र आता त्यांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांच्या मतांवर परिणाम होऊ शकतो सगळं मतांचं गणित बदलू शकतं. तसेच काही दिवसांआधी ते म्हणाले होते की, निलेश लंके यांनी इंग्रजीतलं भाषण पाठ करून दाखवलं तर मी माघार घेईल, असा दावा केला होता. त्यावर निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलत असताना सुजय विखेंवर पलटवार केला आहे. (Sujay Vikhe Patil viral video)

सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर इंग्रजी भाषेवरून टीका केली होती. मात्र त्यावर निलेश लंके यांनी प्रत्युत्तर दिलंय. खासदाराला इंग्रजी भाषा येणं गरजेचं नाही. त्याला केवळ जनतेचे प्रश्न मांडता येणं गरजेचं आहे आणि ते अंमलात आणणं गरजेचं आहे. माझ्याकडे डिग्री नाही. ते असतील डॉक्टर पण त्यांनी कोरोनाकाळात किती जणांची सेवा केली. मी कोरोनाकाळात 30 हजार लोकांची सेवा केली असल्याचं सांगत निलेश लंके यांनी सुजय विखे यांच्यावर पलटवार केला.

News Title – Sujay Vikhe Patil viral video Ahmednagar loksabha Election

महत्त्वाच्या बातम्या

‘या वयात साहेबांना सोडायला नको होतं’; काय म्हणाले अजित पवार?

‘थॅंक्स टू गद्दार लोक्स’; किरण मानेंची पोस्ट तूफान व्हायरल

“भाजपला मतदान करा”; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

शेकापचं अस्तित्व धोक्यात?; जयंत पाटलांमुळे पक्षाला गळती

“चित्राबाई पॉर्न बघत असतील, आक्रस्थळी बाईने…”, अंधारेंचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर