सुरेश रैनावर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील व्यक्तीचा अपघातात मृत्यू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Suresh Raina | टीम इंडियाचा आणि आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा खेळाडू सुरेश रैनाबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. सुरेश रैनाच्या (Suresh Raina) चुलत भावाने अपघातात जीव गमावला आहे. सुरेश रैना आणि त्याच्या कुटुंबावर या घटनेनं दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रस्ता ओलांडत असताना ही धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर आलीये. हिमाचलच्या कांगडा येथे हा अपघात झाल्याची माहिती समोर आलीये.

सुरैश रैनाच्या भावाचा अपघात

रैनाचा (Suresh Raina) चुलत भाऊ आणि त्याचा साथीदार रस्ता ओलांडत असताना त्यांचा अपघात झाला. सौरव कुमार असे रैनाच्या भावाचं नाव होतं. ते रात्री दुकान बंद करून घरी जायला निघाले होते. तेव्हा एका वाहनाने त्यांना धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आलीये. अपघातानंतर आरोपी पळून गेले मात्र त्यांना बाजारपेठेतून पोलिसांनी पकडलं. (Suresh Raina)

पोलिसांच्या माहितीनुसार अज्ञात वाहनाने स्कूटीला रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास धडक दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला तर अपघात झालेल्यांची सौरव कुमार आणि शुभम अशी नावं होती. ते दोघेही कुठमा येथील रहिवासी आहेत. (Suresh Raina)

अपघात झालेला सौरव कुमार आणि सुरैश रैनाचं जवळचं नातं आहे. सौरव कुमार हा सुरेश रैनाचा चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आलीये. याबाबत माहिती देत असताना कांगडाच्या एसपी शालिनी अग्नीहोत्री यांनी सांगितलं की, गग्गल पोलिस स्टेशन अंतर्गत हिट अँड रनचं प्रकरण समोर आलं आहे. टॅक्सी चालकाने स्कूटर चालवत असलेल्या तरूणाला धडक देऊन टॅक्सी ड्रायव्हर पसार झाला.

आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पसार झालेल्या टॅक्सी ड्रायव्हरला भाजी मंडईतून पकडलं आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आलीये. आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, सुरेश रैना हा भारतीय संघ आणि चेन्नई सुपरकिंग संघाचा माजी खेळाडू होता. टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि कर्णधार म्हणून महेंद्र सिंहची ओळख आहे. महेंद्र सिंहच्या निवृत्ती दिवशी सुरेश रैनाने आपली निवृत्ती घोषित केली.

News Title – Suresh Raina Cousin Brother Accident And Died At Himachal Road

महत्त्वाच्या बातम्या

वाद चिघळला; ‘हा’ नेता म्हणतोय… तर शरद पवार 84 वर्ष जगले नसते

अभिषेक बच्चनमुळे ‘ही’ अभिनेत्री गेली होती डिप्रेशनमध्ये; धक्कादायक कारण समोर

देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेताय? ‘या’ बड्या नेत्याने केली नम्रपणे विनंती

विद्यार्थ्यांनो… दहावीनंतर पुढे प्रवेश घेण्यासाठी ‘या’ पर्यायांचा विचार करा

राजकारण तापलं; देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला इशारा