‘खूप काही चुकीचं…’; रोहित शर्माची पत्नी रितीकाच्या कमेंटने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | आयपीएल 2024 (IPL 2024) चा लिलाव झाला असून करोडो रूपये यावेळी उधळण्यात आले आहेत. काही दिवसांआधी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स या संघामध्ये ट्रेड विंडोच्यामाध्यमातून प्रवेश दिला गेला. एवढंच नाहीतर पांड्याला आता मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदाची धुरा दिली आहे. याबाबत रोहितची पत्नी रितीकाने पहिल्यांदाच भाष्य केलंय.

आयपीएल 2024 प्रकरणाला वेगळं वळण 

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघामध्ये प्रवेश दिला आणि रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला कर्णधारपदाचा दावेदार म्हणून निवड करण्यात आली आहे. तेव्हापासून अनेक मुंबई इंडियन्स संघाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. काहींनी मुंबई इंडियन्स संघाच्या अधिकृत इंस्टा हँडलला अनफॉलो केलं असल्याची माहिती समोर आली आहे.

यावर आता मुंंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचरने एका माध्यमाशी बोलताना खरं कारण सांगितलं आहे. ते म्हणाले की “रोहित शर्मा हे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यानं काही वर्ष मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद भूषवलं असून तो एक चांगला खेळाडू आहे त्यात काही शंका नाही.”

रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढणं हा क्रिकेटशी अंतर्गत निर्णय आहे. भारतातील लोकं लगेच भावूक होत असून काही बाबी समजून घेत नाहीत. हार्दिक पांड्याला कर्णधारापदाची संधी दिल्यानं रोहित शर्माला फलंदाजी करता येईल, त्याला आपल्या खेळाचा आनंद घेऊ द्या, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावर आता रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेहने कमेंट केली आहे.

IPL 2024 | काय म्हणाली रितीका सजदेह?

रितीका सजदेहने प्रशिक्षक बाउचरच्या पोस्टवर कमेंट केली आहे आणि अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रितीकानं एका वाक्यामध्ये आपली नाराजी, आपला राग आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “यात खूप काही चुकीचं आहे…” अशी कमेंट त्यांनी केली आहे.

Ritika_Comments

रितीकाच्या कमेंटनं क्रीडाक्षेत्रामध्ये खळबळ

रितीका सजदेहने केलेल्या कमेंटमुळे क्रीडाक्षेत्रामध्ये खळबळ पसरली आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या या निर्णयाचा अनेक चाहते विरोध करत आहेत. यामुळे आता चाहत्यांमध्ये संताप होण्याची चिन्हे आहेत.

News Title – IPL 2024 Rohit Sharma Mumbai Indians Captaincy

महत्त्वाच्या बातम्या