लेकापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अडचणीत; ‘त्या’ फोटोने नवा वाद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut |  शिंदे आणि भाजप सरकारचं राज्य आल्यापासून राज्यातील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. उल्हासनगरमध्ये हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये गणपत गायकवाड प्रकरण घडलं आणि त्यानंतर शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यानं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील गुन्हेगारांसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली.

पिता-पुत्रांचा गुन्हेगारांशी संबंध?

आधी श्रीकांत शिंदे यांच्यासोबत पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकरचा फोटो व्हायरल झाला. तर अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुण्यातील गणेश घायवळ या गुंडाचा फोटो व्हायरल झाला आहे. यामुळे सध्याच्या राज्यातील राजकारणामध्ये गुंडाराज असल्याच्या टीका विरोधकांकडून होताना दिसत आहे. पिता-पुत्राचा गुंडांसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानं त्याचा गुन्हेगारांशी संबंध असल्याच्या चर्चा होत आहेत. यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुणं हे विद्येचं माहेरघर आहे आणि आज ही काय अवस्था करून ठेवली आहे?, असा सवाल उपस्थित केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत? 

महाराष्ट्रात गुंडा राज आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने.., असं राऊतांनी म्हटलंय.