“आम्हाला संपूर्ण जगाशी मैत्री हवी आहे पण…”, Amit Shah यांचा दहशतवाद्यांना इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amit Shah । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवाद्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. भारताला जगाशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत, मात्र देशाच्या सीमा आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. भारत हा जगाच्या समस्यांवर उपाय देणारा देश म्हणून उदयास आला आहे, मात्र दहशतवाद आणि त्याला आर्थिक मदत करणाऱ्यांविरोधात एकत्र येण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद असे काही नाही, दहशतवाद हा दहशतवाद असून त्याला जशास तसे उत्तर द्यायला हवे. ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनने सोमवारी आयोजित केलेल्या ‘Security Beyond Tomorrow’ या कार्यक्रमात अमित शाह बोलत होते. यावेळी त्यांनी ‘ओआरएफ फॉरेन पॉलिसी सर्व्हे’चे प्रकाशनही केले.

सुरक्षेबाबत तडजोड नाही – शाह

अमित शाह म्हणाले की, परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा धोरण यामध्ये कोणतेही अंतर नाही. आम्हाला संपूर्ण जगाशी चांगले संबंध हवे आहेत, परंतु त्याच वेळी आम्हाला आमच्या सीमांचा आदर हवा आहे, आमच्या देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणताही हलगर्जीपणा केला जाणार नाही. आमच्यासाठी देशाच्या नागरिकांची आणि देशाची सीमा ही सर्वोच्च आहे.

तसेच 2014 पूर्वी अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेबाबत कोणतेही धोरण नव्हते. मात्र, मागील 10 वर्षांत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेची मूलभूत रचना मजबूत करण्याचे काम केले आहे. परराष्ट्र धोरणाच्या ओझ्याखाली काँग्रेस सरकारांमध्ये देशाच्या सुरक्षा धोरणाकडे दुर्लक्ष झाले, अशा शब्दांत अमित शाहंनी काँग्रेसला टोला लगावला.

Amit Shah यांचा दहशतवाद्यांना इशारा

पण, आता आपले परराष्ट्र धोरण स्पष्ट झाले आहे. आम्हाला संपूर्ण जगाशी मैत्री हवी आहे. आमचे धोरण स्पष्ट आहे, पण जर आम्हाला दोघांपैकी एकाची निवड करायची असेल तर आम्ही आमच्या सीमा आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, भाजप तिसऱ्यांदा सत्तेत परतणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास होत आहे. भारताने राजकीय स्थैर्य प्राप्त केले आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाची अनेक कारणांनी प्रशंसा केली जाते. G20 शिखर परिषदेत भारताला वेगवेगळ्या देशांना एकत्र आणण्यात यश आले. सर्व नेत्यांनी एकमताने या निर्णयाला मान्यता दिली.

News Title- home minister Amit Shah’s warning to terrorists in Security Beyond Tomorrow event
महत्त्वाच्या बातम्या –

Narendra Modi | महागाईवरून काँग्रेसवर घणाघात; मोदींच्या लोकसभेतील भाषणातील 10 प्रमुख मुद्दे, वाचा

Ram Mandir आंदोलनाचे श्रेय मी घेऊ नये म्हणून मला राजकारणातून संपवलं; माजी केंद्रीय मंत्र्याचा दावा

Cricket News | वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूला बंदुकीचा धाक दाखवून लुटले; फोन आणि बॅग हिसकावून चोरटे पसार

Aishwarya Rai | अखेर ऐश्वर्याच्या अभिषेकला शुभेच्छा; दुर्मिळ फोटो केला शेअर, चाहत्यांनी चर्चेला दिला पूर्णविराम!

Job Alert | सरकारी नोकरी मिळवण्याची सर्वात मोठी संधी, तब्बल 12 हजार जागा निघाल्या