IND vs ENG | भारताने दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली आहे. भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवत पाहुण्या इंग्लिश संघाचा पराभव केला. विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाच्या विजयानंतर गदारोळ झाला आहे. खरं तर झाले असे की, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यावर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंडविरुद्धची 5 सामन्यांची कसोटी मालिका दोन सामन्यांनंतर 1-1 अशी बरोबरीत आहे. आता उरलेल्या 3 सामन्यांमध्ये जो संघ अधिक सामने जिंकेल तो ट्रॉफीवर कब्जा करेल. भारत कोणत्याही परिस्थितीत कसोटी मालिका अनिर्णित ठेवण्याचा विचार करणार नाही. हैदराबाद कसोटीतील पराभवानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात 106 धावांनी दणदणीत विजय नोंदवला.
गांगुलीच्या वक्तव्यामुळे गदारोळ
मात्र, कसोटी सामना सुरू असताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने एक पोस्ट केली होती, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळवला गेला, ज्यात विजय मिळवून पाहुण्या इंग्लिश संघाने विजयी सलामी दिली. त्यामुळे दुसरा सामना यजमान भारतासाठी खूप महत्त्वाचा होता.
सौरव गांगुलीने दुसरा सामना सुरू असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, जेव्हा मी बुमराह, सिराज आणि मुकेश कुमारला गोलंदाजी करताना पाहतो तेव्हा मला वाटते की भारतात टर्निंग ट्रॅक तयार करण्याची गरज का आहे. चांगल्या विकेट्सवर सामने खेळण्याची माझी इच्छा प्रत्येक सामन्याबरोबर प्रबळ होत जाते. हे गोलंदाज कोणत्याही परिस्थितीत 20 बळी घेऊ शकतात. त्यांना कुलदीप आणि अक्षरसारख्या गोलंदाजांची साथ हवी आहे. घरच्या खेळपट्टीमुळे मागील 6 ते 7 वर्षांत फलंदाजीची पातळी थोडी खालावली आहे. चांगली खेळपट्टी असणे निश्चितच महत्त्वाचे आहे.
When I see Bumrah Sami Siraj Mukesh bowl . I wonder why do we need to prepare turning tracks in india ..my conviction of playing on good wickets keeps getting stronger every game .. They will get 20 wickets on any surface with ashwin jadeja Kuldeep and axar .. batting quality…
— Sourav Ganguly (@SGanguly99) February 3, 2024
IND vs ENG मालिकेचा थरार
सौरव गांगुलीने टर्निंग ट्रॅकबाबत भाष्य केले होते आणि दुसऱ्या कसोटीनंतर भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, क्युरेटर खेळपट्टी तयार करतात. आम्ही ‘रँक टर्नर’ मागत नाही. भारतातील खेळपट्ट्यांवर चेंडू फिरकी घेतो हे उघड आहे. पण चेंडू किती टर्न होईल, याबाबत सांगायला मी काही तज्ञ नाही. भारतात चार-पाच दिवस खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करते.
दरम्यान, 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता, तर दुसरा सामना जिंकून भारताने पराभवाचा वचपा काढला. विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाच्या विजयानंतर घरच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. उर्वरीत तीन सामन्यांसाठी बीसीसीआयने अद्याप भारतीय संघ जाहीर केला नाही.
News Title- IND vs ENG 2nd test match coach rahul dravid react on former player Sourav Ganguly’s post
महत्त्वाच्या बातम्या –
“आम्हाला संपूर्ण जगाशी मैत्री हवी आहे पण…”, Amit Shah यांचा दहशतवाद्यांना इशारा
Narendra Modi | महागाईवरून काँग्रेसवर घणाघात; मोदींच्या लोकसभेतील भाषणातील 10 प्रमुख मुद्दे, वाचा
Ram Mandir आंदोलनाचे श्रेय मी घेऊ नये म्हणून मला राजकारणातून संपवलं; माजी केंद्रीय मंत्र्याचा दावा