Ram Mandir आंदोलनाचे श्रेय मी घेऊ नये म्हणून मला राजकारणातून संपवलं; माजी केंद्रीय मंत्र्याचा दावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | राम मंदिराचे उद्घाटन झाले असले तरी त्यावरून राजकारण अद्याप सुरू आहे. विरोधक सत्ताधारी भाजपवर राम मंदिराच्या मुद्द्याचे राजकारण केले असल्याचा आरोप करत आहेत. तर भाजपने हिंदू द्वेष म्हणत वारंवार विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अशातच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांनी एक मोठा दावा केला आहे. विद्यार्थिनीवरील बलात्काराच्या आरोपातून एमपी-एमएलए कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर ते प्रथमच माध्यमांसमोर आले.

आपली प्रतिमा डागाळण्यासाठी राजकीय षडयंत्राचा भाग म्हणून आपल्यावर हे आरोप लावण्यात आल्याचे माजी मंत्री म्हणाले. राम मंदिर आंदोलनात ते सक्रिय होते, त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्याविरुद्ध हे कट रचले, असा आरोप यावेळी त्यांनी केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारच्या काळात स्वामी चिन्मयानंद हे केंद्रीय गृहराज्यमंत्री होते.

स्वामी चिन्मयानंद यांचा दावा

अलीकडेच तब्बल 13 वर्षांनंतर खासदार-आमदार यांच्यासाठी असलेल्या एमपी-एमएलए न्यायालयाने त्यांची बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. काशी आणि मथुरा येथील धार्मिक स्थळांच्या वादावर स्वामी चिन्मयानंद म्हणाले की, हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने वाद सोडवला पाहिजे.

तसेच भारतातील सर्व मुस्लिमांचे पूर्वज हिंदू आहेत, त्यामुळे त्यांनी आक्रमणकर्त्यांशी स्वतःला जोडू नये. माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांचे म्हणणे आहे की, माझ्यावर लावण्यात आलेले आरोप रामजन्मभूमीवरील न्यायालयाच्या निर्णयानंतर झाले कारण मी रामचंद्रभूमी आंदोलनात काम केले होते. मी राम मंदिराच्या आंदोलनाचे श्रेय घेईन म्हणून मला अडकवण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

Ram Mandir आंदोलनाचे श्रेय मी घेऊ नये म्हणून…

स्वामी चिन्मयानंद यांनी सांगितले की, मी राम मंदिराच्या आंदोलनाचे श्रेय घेऊ नये म्हणून काहींनी मुद्दाम मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मथुरा आणि काशीच्या मुद्द्यावर दोन्ही समुदायांनी एकत्र बसून या समस्येवर तोडगा काढला तर खूप चांगले होईल कारण देशात राहणारे मुस्लिम देशाबाहेर जाणार नाहीत. त्यांचे पूर्वजही भारतातीलच आहेत. मी देशातील मुस्लिमांना विनंती करतो की त्यांनी आक्रमणकर्त्यांशी स्वतःला जोडू नका. ते भारताच्या संस्कृतीशी निगडित लोक आहेत.

दरम्यान, न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांना 13 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात निर्दोष मुक्त केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारच्या काळात स्वामी चिन्मयानंद हे केंद्रीय गृहराज्यमंत्री होते. चिन्मयानंद यांचे वकील फिरोज हसन खान यांनी सांगितले होते की, एमपी-एमएलए न्यायालयाने पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. स्वामी चिन्मयानंद यांना 19 डिसेंबर 2022 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाला. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते.

News Title- Ram Mandir Former Union Minister of State for Home Swami Chinmayanand has made a big claim
महत्त्वाच्या बातम्या –

Cricket News | वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूला बंदुकीचा धाक दाखवून लुटले; फोन आणि बॅग हिसकावून चोरटे पसार

Aishwarya Rai | अखेर ऐश्वर्याच्या अभिषेकला शुभेच्छा; दुर्मिळ फोटो केला शेअर, चाहत्यांनी चर्चेला दिला पूर्णविराम!

Job Alert | सरकारी नोकरी मिळवण्याची सर्वात मोठी संधी, तब्बल 12 हजार जागा निघाल्या

ऐश्वर्या-अभिषेकचं नक्कीच बिनसलंय; ऐश्वर्याने केलं असं काही की…

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट!