भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ganpat Gaikwad | गणपत गायकवाड Ganpat Gaikwad) हे प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चाललं असून हे प्रकरण चांगलंच तापताना दिसत आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडवर गोळीबार केल्यानं गणपत गायकवाड यांना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

महेश गायकवाडवर हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये तब्बल सहा गोळया झाडल्यानं ते गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. गणपत गायकवाड यांच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घरातील कोणत्याही व्यक्तींनी भेटू नये अशी सक्त ताकिद पोलिसांनी दिली आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार त्यांनी अन्न त्याग केला आहे.

गणपत गायकवाड यांचा अन्न त्याग  

एकीकडे सर्व गोष्टी घडताना दिसत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आमदार गणपत गायकवाड यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आहे. त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्तींना भेटू दिलं जात नसल्यानं गणपत गायकवाड यांनी अन्न त्याग केला आहे.

पोलिसांच्या विनंतीनंतर घेतला चहा

गणपत गायकवाड प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. त्यांच्यासोबत आणखी दोन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ते काहीच खात नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पोलिसांनी अधिक विनंती केल्यानंतर त्यांनी केवळ चहा घेतला आहे.

गणपत गायकवाडविरोधात शिस्तभंगाची मागणी

आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करोडो रूपये घेतले असल्याचा आरोप केला आहे. यामुळे आता या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त होत आहे. यावर आता शिंदे गटाचे काही नेते उमपुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते. यावेळी त्यांनी शिस्तभंगाची कारवाई केली जावी अशी मागणी केली.

द्वारली प्रकरणाचा तपास सुरू

द्वारली गावामध्ये गणपत गायकवाड यांनी 31 जानेवारीला शेतकऱ्याच्या जातीवरून वक्तव्य केलं. यामुळे आता त्या जागामालकाने गणपत गायकवाडवर अॅट्रॉसिटी दाखल केली. काही गुन्हेशाखेच्या पथकाने त्या जागी जावून चौकशी केली. त्यानंतर ते पथक आता हिललाईन पोलीस ठाण्यात कसून चौकशी करत आहेत.

News Title – Ganpat Gaikwad Case New Update

महत्त्वाच्या बातम्या

“अजित पवार इतके निर्दयी होतील, असं मला वाटलं नव्हतं”

श्रीदेवीच्या मृत्यूचं मोदी कनेक्शन?, 6 वर्षांनंतर मोठा खुलासा

“…त्यावर संस्कारभारती तोंड उघडायला तयार नाही”

भाजप आमदार गोळीबार प्रकरणानंतर शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय!

“ती जखम अजूनही…”, अभिनेत्री भूमी पेडणेकरचा सर्वांत मोठा खुलासा!