Sanjay Raut | राज्यातील उल्हासनगरमध्ये हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणावर आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सामनातून टीकेचे बाण सोडले आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांनी करोडो रूपये घेतले असल्याचा आरोप केला आहे, यावर राऊतांनी (Sanjay Raut) टीका केली आहे.
संजय राऊतांचे भाजप-मुख्यमंत्र्यांवर टीकेचे बाण
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी माझे एकनाथ शिंदे यांच्याकडे करोडो रूपये घेतले असल्याचा जबाब आहे. म्हणजे हे प्रकरण मनी लॉड्रिंगचं असून त्या दिशेने एफआरआय म्हणून चौकशी करावी. ईडीने देखील गायकवाड यांच्या जबाबावर हेमंत सोरेंप्रमाणे शिंदे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राऊतांनी केलीये.
कोट्यवधी रूपये आलेला पैसा हा सरळ मार्गाने आलेला नाही. हा गुन्हेगारीचा पैसा आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांना ‘पीएमएलए’, कायद्याने अटक करावी. महाराष्ट्रात पोलीस ठाणे सुरक्षित नसतील तर काहीच सुरक्षित नाही, असा आरोप राऊतांनी केला आहे.
कायदा आणि सुव्यस्था गुंडांच्या अड्ड्यावर कचरा काढायचं काम करते. पोलीस ठाण्यामध्ये हल्ले करणे, जिल्हाधिकाऱ्यांवर हल्ले करणे हे मिर्झापुरी राजकारण उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनेकदा घडते आता ते महाराष्ट्रामध्ये घडत आहे, असंही ते म्हणालेत.
मुख्यमंत्री हेच गुन्हेगारीचे सुत्रधार आहेत. शिंदे जर मुख्यमंत्री असतील तर राज्यामध्ये गुन्हेगारीची पैदास होईल. असा आरोप गणपत गायकवाड यांनी केला आणि ते तुरूंगात आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या गँगमधील जखमींना पाहण्यासाठी इस्पितळात गेले आणि हळहळले. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील प्रकरण देशानं पाहिली आहेत, असंही राऊतांनी म्हटलंय.
“मोदींकडून अद्यापही कोणती प्रतिक्रिया नाही”
भाजपशासित राज्यात मुंगी पादली तरी प्रतिक्रिया येते. गृहमंत्री अमित शहा आणि मोदी यांची यावर कोणतीही प्रतिक्रिया नाही. मोदी-शहांनी महाराष्ट्रात निवडलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने रक्तपात सुरू आहे. त्यावर संस्कारभारती तोंड उघडायला तयार नाही, अशी टीका त्यांनी केलीये.
Sanjay Raut On Eknath Shinde in samana paper
महत्त्वाच्या बातम्या