Hate Speech | गुजरातमध्ये मौलानाचे प्रक्षोभक भाषण; मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतून ताब्यात घेतले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hate Speech | वादग्रस्त भाषण केल्याप्रकरणी मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुजरात पोलिसांनी रविवारी मुंबईतील इस्लामिक धर्मोपदेशक मुफ्ती सलमान अझहरींना गुजरातमधील जुनागढ येथे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. (Mumbai Maulana Salman Azhari) जुनागढमध्ये काही दिवसांपूर्वी दिलेल्या भाषणानंतर गुजरात पोलिसांनी मौलाना आणि इतर दोन लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. पोलिसांनी रविवारी रात्री मुफ्ती सलमान अजहरी यांना ताब्यात घेतले.

अझहरीला मुंबईतून ताब्यात घेतले

मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात मौलाना यांना ठेवण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या समर्थकांच्या जमावाने पोलीस ठाण्याला बाहेरून घेराव घातला होता. सध्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मौलानांच्या वकिलाने सांगितले की, मुफ्ती सलमान तपासात सहकार्य करण्यास पूर्णपणे तयार आहेत. मात्र, याप्रकरणी पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

रविवारी दिवसभर मुफ्ती सलमान अझहरी यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, त्यांना गुजरात एटीएस, मुंबई एटीएस आणि चिराग नगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या पोस्टमध्ये 25 ते 30 पोलिसांनी मुफ्ती सलमान यांच्या सोसायटीला घेरले आहे आणि ताब्यात घेतले.

Hate Speech प्रकरणी ताब्यात

वादग्रस्त भाषण प्रकरणी ताब्यात असलेले मौलाना आपल्या समर्थकांना आंदोलन न करण्याची विनंती करताना दिसले. एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये मुफ्ती सलमान अजहरी सांगतात की, मी गुन्हेगार नाही आणि मला इथे गुन्हा केला म्हणून आणण्यात आलेले नाही. पोलीस आवश्यक तपास करत आहेत आणि मी देखील त्यांना पाठिंबा देत आहे. माझ्या नशिबात असेल तर मी अटक व्हायला तयार आहे.

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

31 जानेवारी रोजी गुजरातमधील जुनागढमध्ये एका कार्यक्रमादरम्यान भडकाऊ भाषण केल्याचा मौलानावर आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मुफ्ती सलमान, कार्यक्रमाचे आयोजक मोहम्मद युसूफ मलिक आणि अझीम हबीब ओडेदरा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 153 बी आणि 505 (2) अंतर्गत एफआयआर नोंदवला.

दोन स्थानिक आयोजकांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी अझहरी हे धर्म आणि व्यसनमुक्तीबद्दल जनजागृती करणार असल्याचे सांगून कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती.

News Title- Gujarat Police has detained Mufti Salman Azhari from Ghatkopar in Mumbai in connection with the hate speech case
महत्त्वाच्या बातम्या –

Crime News | पत्नीवर संशय, 12 वर्षे बंद खोलीत डांबलं; शौचालयात जाण्यासही बंदी, पोलिसांनी केली सुटका

Irfan Pathan नं पहिल्यांदाच दाखवला पत्नीचा चेहरा; रितेश देशमुखनं केली खास कमेंट

Shraddha Kapoor लवकरच करणार लग्न?, अभिनेत्रीने गोड फोटो पोस्ट करत दिली माहिती

“गोळीबार करणाऱ्या आमदाराला पक्षातून का नाही काढलं?”

भाजप आमदार गोळीबार प्रकरणी मोठी कारवाई!