Shraddha Kapoor लवकरच करणार लग्न?, अभिनेत्रीने गोड फोटो पोस्ट करत दिली माहिती

Shraddha Kapoor

Shraddha Kapoor | बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्री या वर्षी लग्नगाठ बांधत असल्याची चर्चा आहे. यामध्ये रकुल प्रीतपासून क्रिती खरबंदापर्यंतच्या नावांचा समावेश आहे. आता या यादीत आणखी एका नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे. कारण बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूरने लग्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत. श्रद्धाने एक पोस्ट करून याबाबत चाहत्यांना विचारणा केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये श्रद्धाने काय लिहिले आहे, याविषयी बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये वेगवेगळ्या अटकळ सुरू झाल्या आहेत.

श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत भारी कॅप्शन दिले, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली. त्याचबरोबर या पोस्टवर चाहत्यांच्याही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. श्रद्धाने इंस्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. कानात अतिशय गोंडस कानातले घातलेल्या श्रद्धाच्या या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली.

श्रद्धाची एक पोस्ट अन् चर्चांना उधाण

या पोस्टसोबत श्रद्धाच्या कॅप्शननेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. श्रद्धाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, मी छान दिसत आहे, मी लग्न करू का? यानंतर चाहत्यांकडून कमेंट्सचा ओघ आला. नेटकऱ्यांनी अनेक मनोरंजक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हास्यास्पद कमेंट करून अभिनेत्रीची फिरकी घेतली.

एका यूजरने मिश्किलपणे लिहिले की, यासाठी तुला माझ्या आईशी बोलावे लागेल, तर दुसऱ्या युजरने स्थळ आणि मंडप सजवला आहे, लवकर ये, अशी टिप्पणी केली. श्रद्धाच्या या पोस्टवर अनेक स्टार्सही कमेंट करताना दिसले. श्रद्धाचा भाऊ सिद्धांत यानेही या पोस्टवर कमेंट करत हसणाऱ्या इमोजीसह ‘फुल टाईमपास’ असे लिहिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

 

Shraddha Kapoor लवकरच करणार लग्न?

तसेच श्रद्धाच्या पोस्टवर गायक दर्शन रावलची कमेंटही पाहायला मिळाली. श्रद्धाचा चाहतावर्ग मोठा आहे. 2024 या वर्षासाठी श्रद्धा कपूरकडे अनेक चित्रपट आहेत. यामध्ये कार्तिक आर्यनसोबतचा ‘चंदू चॅम्पियन’चा समावेश आहे, जो जूनमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

याशिवाय श्रद्धा कपूरचा सुपरहिट हॉरर कॉमेडी चित्रपट स्त्रीचा सिक्वेल देखील यावर्षी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. ‘स्त्री 2’ 30 ऑगस्टला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. तसेच अनुराग बासूच्या चित्रपटातही श्रद्धा दिसणार आहे.

News Title- Bollywood actress Shraddha Kapoor has shared a post asking whether to get married
महत्त्वाच्या बातम्या –

“गोळीबार करणाऱ्या आमदाराला पक्षातून का नाही काढलं?”

भाजप आमदार गोळीबार प्रकरणी मोठी कारवाई!

“अजित पवार शरद पवारांच्या मरणाची वाट…”, ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

“रोहित पवार यांच्या शरीरामध्ये रक्त नाहीतर जातीयवाद वाहतोय”

‘त्या’ घटनेवर हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरचा संताप, म्हणाली…

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .