‘त्या’ घटनेवर हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरचा संताप, म्हणाली…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Priyadarshini Indalkar | काही दिवसांआधी पुण्यातील एफटीआय येथे काही हिंदुत्ववाद्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. ही घटना होतेय न् होतेय तोवर आता त्याच पुण्यामध्ये ललित कला केंद्रामध्ये ‘जब वी मेट’ हे नाटक सादर करण्यात आलं असून यावेळी काही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तरूणांनी नाटक बंद पाडलं. ललित कला केंद्रातील काचा फोडण्यात आल्या, यामुळे येथील वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे.

ललित कला केंद्रामध्ये अनेक मराठी अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. यामुळे मात्र त्याच ठिकाणी असा धक्कादाक प्रकार घडला आहे. यावेळी काचा फोडण्यात आल्या असून ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे आणि इतर सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यावर आता महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने (Priyadarshini Indalkar) संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाली प्रियदर्शिनी? (Priyadarshini Indalkar)

प्रियदर्शिनी इंदलकरनं नाटक बंद पाडणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तरूणांनी केलेल्या हल्ल्याचा जाहिर निषेध केला आहे. तिनं आपल्या इंन्टाग्रमावर पोस्ट शेअर केली असून “ललित कला केंद्र, पुणे येथे नाटक बंद पाडून कलावंतांवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी कृत्याचा जाहिर निषेध”, अशी प्रतिक्रि या दिली.

Priyadarshini Indalkar : 'त्या' दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध; महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकर भडकली

ललित कला केंद्रामध्ये तोडफोड

ललित कला केंद्रामध्ये ‘जब वी मेट’ हे नाटक सुरू होतं. मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे नाटक बंद पाडलं आहे. यावेळी ललित कला केंद्राची तोडफोड देखील करण्यात आली होती. काचा देखील फोडण्यात आल्या असून शाई फेक देखील करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी ललित कला केंद्राच्या प्रमुखांना अटक करण्यात आलं.

ललित कला केंद्राच्या प्रमुखांना अटक

ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे यांना पोलिसांनी अटक केली. तसेच इतर सहा जणांना पोलिसांनी जेरबंद केलं. त्यांना न्यालायामध्ये हजर करण्यात आलं आहे. याचसोबत पोलिसांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आहे.

कोण आहे प्रियदर्शिनी? (Priyadarshini Indalkar)

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमामध्ये अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरनं वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. तिनं तिच्या लहानपणी अफलातून कॉमेडी लिटिल मास्टर्स या कार्यक्रमातून विनोदी कलाकार म्हणून पदार्पण केलं. तिनं काही महिन्यांआधी मराठीतील अभिनेते सुभोध भावे यांच्यासोबत फुलराणी या मालिकेमध्ये काम केलं होतं.


News Title – Priyadarshini indalkar lalit kala kendra issue

महत्त्वाच्या बातम्या

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे सामना होणार?

छगन भुजबळांच्या राजीनाम्याची बातमी ऐकताच मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Share Market This Week l अर्थसंकल्पानंतर बाजार नवा उच्चांक गाठणार? होल्डर्सचे लक्ष असणार

“मला हाकलवून लावायची गरज नाही मी आधीच राजीनामा…” छगन भुजबळांचा धक्कादायक दावा

गणपत गायकवाड अखेर ‘या’ तारखेपर्यंत गजाआड, काय घडलं कोर्टात?