छगन भुजबळांच्या राजीनाम्याची बातमी ऐकताच मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhagan Bhujbal | मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी काही महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारकडे मागणी केली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत मनोज जरांगे यांनी सरकारकडे मागणी केली. मात्र छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध दाखवला आहे. यावर राज्यातून अनेक ठिकाणाहून राजीनामा देण्याबाबत भुजबळांवर टीका होत आहे. यावर भुजबळांनी गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले भुजबळ? (Chhagan Bhujbal)

अहमदनगर येथे शनिवारी ओबीसी एल्गार मेळावा होता, त्या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मी याआधीच राजीनामा दिला असल्याचं वक्तव्य भुजबळ यांनी केलं आहे. “17 नोव्हेंबरला अंबड येथे ओबीसी एल्गार रॅलीसाठी आलो होतो. त्याआधीच म्हणजे 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला. त्यामुळे आता मला कोणीच हाकलवायची गरज नाही. मी स्वत: राजीनामा दिला” असल्याचं ते सभेमध्ये म्हणाले आहेत.

भुजबळांच्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे. काही दिवसांआधी शिंदे गटाचे नेते त्यांना राजीनामा देण्यासाठी सांगत होते, मात्र त्यांनी आधीच राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट केला. यावर आता राजकीय नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले सुनिल तटकरे?

भुजबळांच्या राजीनाम्यावर सुनिल तटकरे म्हणाले की,”मी अहमदनगरची सभा पाहिली नाही. मला याबाबत माहिती नाही. माझं त्यांच्याशी कोणतंही बोलणं झालं नाही, मी त्यांची भेट घेऊन याबाबत माहिती मिळवेल”, असं सुनिल तटकरे म्हणाले आहेत. तर यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

गोपीचंद पडळकरांची भुजबळांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया

अनेक दिवसांपासून काही नेते राजीनामा देण्याबाबत टीका करत होते, मात्र भुजबळांनी आधीच राजीनामा दिला. यावर आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की, “भुजबळ यांनी 17 नोव्हेंबरला राजीनामा दिला होता, जे राजीनामा मागत होते त्यांना चपराक बसली”, असल्याच गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी देखील भुजबळांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे-पाटील यांची प्रतिक्रिया

भुजबळांच्या राजीनाम्याच्या गौप्यस्फोटानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “दुसरा विदूषक बाहेर निघाला, ते सरकारला आणि ओबीसींसाठी कलंक आहे, आमची विजयी सभा बघायला ये”, असं म्हणत भुजबळांना मनोज जरांगे-पाटील यांनी आवाहन केलं आहे.

News Title – chhagan bhujbal resign new update

महत्त्वाच्या बातम्या

“फडणवीस लोकांना गोळ्या मारायला…”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

‘ही’ लक्षणे ठरू शकतात हृदयासाठी धोक्याची घंटा; आताच व्हा सावध

अडवाणींना भारतरत्न जाहीर होताच शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला, म्हणाले…

“राज्यात गुंडराज सुरू, उद्या मलाही गोळ्या झाडतील…”

आमदार गोळीबार प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्वांत मोठी घोषणा!