अडवाणींना भारतरत्न जाहीर होताच शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

sharad Lal Krishna Advani | भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री तसेच दिवंगत नेते कर्पुरी ठाकूर यांना देशातील मानाच्या भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. मोदींनी अडवानींचं अभिनंदन केलं आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील दोघांचं अभिनंदन केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचं शरद पवार यांनी अभिनंदन केलं आहे. तसेच त्यांनी राठोड यांचंही कौतुक केलं. दोन्ही नावं या पुरस्कारासाठी उचित असल्याचं शरद पवारांनी आपली भावना व्यक्त केली. कर्पुरी हे अतिशय नम्र होते आणि अडवानी यांनी देशाच्या संसदेमध्ये अनेक वर्षे काम केलं आहे. त्यांनी एखाद दुसरी निवडणूक वगळता त्यांचा पराभव कोणी केला नाही, पुरस्कार देण्याबाबत जरा उशीर केला,, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. त्यांनी ट्विट देखील केलं आहे.

अडवाणींना पुरस्कार (Lal Krishna Advani), नरेंद्र मोदींच्या पोटात आनंद मावेना

अडवाणींना भारतरत्न मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी खुश आहेत. त्यांनी अडवाणींना फोन करत खुशखबर दिली. मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे, असं ट्विट त्यांनी केलं असून नरेंद्र मोदींच्या पोटात आनंद मावेनासा झाला आहे.

कर्पुरी ठाकूर यांनाही भारतरत्न

आडवाणींसोबत आता बिहारचे दिवंगत माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न मरणोत्तर पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यावर शरद पवार यांनी दोन्ही निवड योग्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी सध्या सुरू असलेल्या देशातील आणि राज्यातील घडामोडींवर प्रकाशझोत टाकला.

गणपत गायकवाड प्रकरणी शरद पवार काय म्हणाले?

भारतरत्न पुरस्काराच्या प्रतिक्रियेनंतर शरद पवार यांनी गणपत गायकवाड प्रकरणावर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले की सध्या राज्यामध्ये फायरिंग होत आहे, याचा अर्थ राज्य नेमक्या कोणत्या दिशेला चाललं आहे? राज्यात असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

सरकार बघ्याची भूमिका घेत आहे? – शरद पवार

भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड प्रकरणी शरद पवारांनी मौन खोललं आहे. राज्यामध्ये फायरिंग सारखा प्रकार घडतो. राज्यामध्ये असं काही घडत असून राज्य कोणत्या दिशेनं जात आहे सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी  दिली आहे.

News Title – lal krishna advani declared bharat ratna 

महत्त्वाच्या बातम्या

शरद मोहोळच्या हत्येनंतर मारेकऱ्याचं देवदर्शन, ‘या’ राज्यातील मंदिरांमध्ये केला अभिषेक

भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारत रत्न जाहीर!

आमदाराच्या गोळीबारानं वातावरण तापलं; प्रशासनाने घेतला सर्वांत मोठा निर्णय

‘तू गप्प बस, नाहीतर टपकन…’; जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना इशारा

अभिनेत्री पूनम पांडे निघाली जिवंत, सोशल मीडीयावर व्हिडीओ तूफान व्हायरल