अभिनेत्री पूनम पांडे निघाली जिवंत, सोशल मीडीयावर व्हिडीओ तूफान व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Poonam Pandey | पुनम पांडेच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला होता. मात्र तिचा मृत्यू झाला आहे यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. पुनमच्या सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या होत्या. मॅाडेल म्हणून पूनम पांडेची ओळख आहे. चाहत्यांसाठी कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असते. तिचं निधन झाल्याचं समोर आल्यावर याबाबत कोणीही दुखः व्यक्त केलं नाही पण नेटकऱ्यांनी मात्र हा तिचा स्टंट असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. आणि तसंच काहीसं घडलं.

“मी जिवंत आहे”

पूनम पांडेच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या मॅनेजरने तिचं निधन झाल्याची पोस्ट टाकली होती. दरम्यान, याबाबत स्वतः पूनम पांडेनी खुलासा केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत पूनम म्हणाली, “मी जिवंत आहे.

माझं निधन सर्वाइकल कॅन्सरने झालेलं नाही. दुर्दैवाने मी त्या हजारो महिलांबद्दल हे बोलू शकत नाही, ज्यांनी सर्वाइकल कॅन्सरमुळे आपले प्राण गमावले आहेत. ते या आजाराविषयी काही करू शकत नाही, असा प्रश्न नाही. पण नेमकं काय करावं हेच त्यांना माहीत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

नेटकरी भडकले

पूनम पांडेने (Poonam Pandey) जिवंत असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर तिने याबाबत स्वतः खुलासा केला आहे. पूनमच्या जाण्यानं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, काहीजणांनी ती जिवंत आहे, स्टंटसाठी पण ती ही गोष्ट करु शकते अशा प्रकारचे कमेंट केल्या होत्या. तर सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील पूनम जिवंत असल्याचं म्हटलं होतं.

पूनमने आज काही तासापूर्वी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मी जिवंत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, आता पूनम पांडे हिचा नेटकरी चांगलाच समाचार घेताना दिसत आहेत. लोकांनी कमेंट करत पूनम पांडे हिला चांगलेच खडसावले आहे. हेच नाही तर अनेकांनी थेट म्हटले की, काय फालतूगिरी आहे ? तर व्हिडीओमध्ये पूनम पांडे ही सांगत आहे की, गर्भाशयातील कॅन्सर हा रोखला जाऊ शकतो.

News Title : I am alive says poonam pandey

महत्त्वाच्या बातम्या-

आमदाराच्या गोळीबारानं वातावरण तापलं; प्रशासनाने घेतला सर्वांत मोठा निर्णय

‘तू गप्प बस, नाहीतर टपकन…’; जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना इशारा

अभिनेत्री पूनम पांडे निघाली जिवंत, सोशल मीडीयावर व्हिडीओ तूफान व्हायरल

मोठी बातमी! पूनम पांडे जिवंत आहे, स्वत: समोर येत केला मोठा खुलासा

“तो पैसा राजकीय पक्षांच्या फंडात…”, राज ठाकरेंचा खळबळजनक दावा