आमदाराच्या गोळीबारानं वातावरण तापलं; प्रशासनाने घेतला सर्वांत मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ganpat Gaikwad Firing case | कल्याण डोंबिवली शहरात घडलेल्या एका घटनेमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला आहे. भाजप आमदाराने (Ganpat Gaikwad Firing) थेट पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला आहे. त्यात महेश पाटील गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर तातडीने त्यांना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या घटनेनंतर कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत.

गोळीबारनंतर कल्याण बंदची हाक

या घटनेमुळे पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Firing case) यांचे घर आणि कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच, गोळीबार करण्यात आलेले महेश गायकवाड यांच्या कार्यालयासह घराजवळही पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. यानंतर प्रशासनाने दंगल नियंत्रक पथकही तैनात केले आहे.

महेश गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबाराचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता कल्याण पूर्व येथे दुकाने बंद करण्यात आली आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून निषेध करण्याचे आव्हान केल्यानंतर कल्याण बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

गोळीबारप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी आता गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Firing case) यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी नागेश बाडेकर, वैभव गायकवाड आणि विकी गणित्रा या फरार आरोपींचा आता शोध सुरू आहे. गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडलाही आरोपी करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड आणि गोळीबार झालेले महेश गायकवाड यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. गेल्या तीन चार दिवसांपासून उल्हासनगर येथे एका जागेचा वाद सुरू होता. यावरूनच शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात येथील जागेवर एक भिंत बांधण्यात आली होती. मात्र, ती भिंत शिंदे गटाने पाडली. हा वाद नंतर पोलिस ठाण्यापर्यंत गेला.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कार्यालयात आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Firing case) आणि शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचा सहकारी राहुल पाटील उपस्थित होते.त्यांच्यात वाद सुरू असतानाच येथे पोलिसांसमोरच गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला.

News Title-  Ganpat Gaikwad Firing case kalyan city closed

महत्वाच्या बातम्या-

“राज ठाकरे मराठ्यांविरोधात कधी बोलायला लागले?”

भाजप आमदाराची दबंगगिरी, पोलिस ठाण्यातच शिंदे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या; नेमकं काय घडलं?

नांदेड सिटीतील नागरिकांना मोठा दिलासा, पीटी ३ अर्ज भरण्याबाबत पुणे महापालिकेची मोठी माहिती

एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट!

महाविकास आघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…