भाजप आमदाराची दबंगगिरी, पोलिस ठाण्यातच शिंदे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या; नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ganpat Gaikwad Firing | कल्याण डोंबिवली शहरात काल (2 फेब्रुवारी) मोठा राडा झाला. भाजप आमदाराने (Ganpat Gaikwad Firing) थेट पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याने खळबळ माजली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर थेट गोळीबार केला आहे. त्यात महेश पाटील गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर तातडीने त्यांना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणे आणि संदीप सर्वांकर यांना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  या प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली आहे. विरोधी पक्षाकडून आता भाजपवर निशाणा साधला जात आहे. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावरही गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

“..म्हणून मी गोळीबार केला”

भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Firing) यांनी नंतर घटनेची जबाबदारी घेत आपणच गोळीबार केल्याचे कुबुलही केले. पोलीस ठाण्याच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. यांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला. याचा मला मनस्ताप होता. त्यात माझ्या समोरच माझ्या मुलाला पोलिस ठाण्यात मारहाण करत होते. मला त्यांना जीवे मारायचे नव्हते. पण, पोलिसांसमोर माझ्यावर जर कुणी हल्ला करत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करणे भाग होते.”, असे गणपत गायकवाड म्हणाले आहेत. तसेच, या प्रकरणी मला कसलाच पश्चाताप नसल्याचेही गायकवाड यांनी म्हटले आहे.

नेमकं काय घडलं?

गेल्या तीन चार दिवसांपासून उल्हासनगर येथे जागेचा वाद सुरू होता. यावरूनच शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये चांगलाच वाद झाला. उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात येथील जागेवर एक भिंत बांधण्यात आली होती. मात्र, ती भिंत शिंदे गटाने पाडली. हा वाद नंतर पोलिस ठाण्यापर्यंत गेला.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कार्यालयात आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Firing) आणि शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचा सहकारी राहुल पाटील उपस्थित होते.त्यांच्यात वाद सुरू असतानाच येथे पोलिसांसमोरच गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला.

News Title- Ganpat Gaikwad firing on Mahesh Gaikwad

महत्त्वाच्या बातम्या –

नांदेड सिटीतील नागरिकांना मोठा दिलासा, पीटी ३ अर्ज भरण्याबाबत पुणे महापालिकेची मोठी माहिती

एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट!

महाविकास आघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

पूनम पांडेचा मृत्यू म्हणजे अफवा?; मोठी अपडेट समोर

“एक ओळख असावी यासाठी मी कॉन्ट्रोव्हर्सी केली…”पूनम पांडेच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ