एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम गेल्या काही महिन्यांपासून दौऱ्यावर आहेत. शिवाय नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते रोजच राज्यातील अनेक भागात दौरा करत असतात. मुख्यमंत्री गावा-गावात जाऊन येथील नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी सभा घेत असतात. दरम्यान काही दिवासांपासून एकनाथ शिंदेंना डोळ्यांचा त्रास होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांना आज रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेल्याचं समोर आलं आहे. या वेळी डॅाक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

काय म्हणाले डॅाक्टर?

एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) काही दिवसांपासून डोळ्यांचा त्रास जाणवत असल्याने त्यांना आज रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांना लेझरच्यामाध्यमातून शस्रक्रिया करण्याबाबत सल्ला दिला. आपल्या नातवाचा वाढदिवस साजरा करत त्यांनी  त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द करत शस्त्रक्रिया केली.

प्रकृतीबाबत काय म्हणाले?

सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आपल्या ठाण्याच्या घरी परतले आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या शस्त्रक्रियेनंतर काही काळ विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे.

एकनाथ शिंदेंना आपल्या नातवासोबत अनेकदा पाहिलं आहे. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. अशातच गुरूवारी आपला नातू रूद्रांशचा वाढदिवस साजरा करत त्यानंतर ठाण्यातील माजीवाडा येथील एका प्रख्यात डॉक्टरांकडून आपल्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली. या शस्रक्रियेनंतर एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर आहे.

वाढदिवसाचे बॅनर-

एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे दोघांचे वाढदिवस एकाच महिन्यामध्ये आहेत. यामुळे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘आमची निष्ठा कालपण ईथेच होती, आजही इथेच आहे आणि उद्याही इथेच राहिल;, अशा आशयाचे बॅनर शहरामध्ये झळकत आहेत.

News Title : big update about eknath shinde healths

महत्त्वाच्या बातम्या-

32 व्या वर्षी पुनम पांडे सोडून गेली ‘एवढ्या’ रूपयांची संपत्ती, आकडा वाचून तुम्ही सुद्धा व्हाल थक्क!

गुडन्यूज! आरोग्य विमा खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

‘शरद पवारांना जाणता राजा म्हणतो पण…’; ठाकरे कुटुंबातील व्यक्तीचं वक्तव्य चर्चेत

‘मनोज जरांगे पाटील फसवले गेले’; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

गोव्यातील व्हिडीओ शेअर करत पुनम पांडे म्हणाली “माझं जीवन…”