32 व्या वर्षी पुनम पांडे सोडून गेली ‘एवढ्या’ रूपयांची संपत्ती, आकडा वाचून तुम्ही सुद्धा व्हाल थक्क!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Poonam Pandey | अभिनेत्री पुनम पांडेने वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर सेमिन्यूड फोटोशूटमुळे चर्चेत असणाऱ्या पुनमला गर्भाशयाचा कर्करोग झाला होता. गेल्या काही दिवसांपासून पुनम कर्करोगाशी झुंज देत होती. एवढंच नाही तर दोन दिवसांपूर्वी पुनमने तिच्या अधिकृत अकाउंटवरुन तिचा गोव्यातील व्हिडीओ शेअर केला होता. पुनम अनेकेळा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मात्र, सध्या चर्चा आहे ती पुनमच्या संपत्तीची.

पुनमची आता पर्यंतची संपती-

पुनमला माॅडेलिंगमुळे आणि सेमीन्यूड फोटोशूटमुळे प्रसिद्धी मिळाली होती. सोशल मीडियावर पुनमने आपल्या चाहत्यांसाठी तिचे बाॅल्ड फोटो पोस्ट केले आहेत. दरम्यान वयाच्या 32 व्या वर्षी पुनमने कोटी रुपयाची संपत्ती मिळवली आहे. पूनमची एकूण संपत्ती जवळपास 7 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 52 कोटी रुपये इतकी आहे.

या सोबतच मुंबईतील वांद्रे परिसरात पुनमचं अलिशान अपार्टमेंट देखील आहे. या अपार्टमेंटची किंमत कोट्यवधी रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे लग्झरी कारसुद्धा आहेत. तिच्याकडे असलेल्या BMW 5 सीरिजमधील सेडान कारची किंमत जवळपास 55 लाख रुपये आहे.

पुनमचं एकूण मानधन-

पुनम फक्त माॅडलिंगच नव्हे तर अनेक जाहिरातींमध्ये सुद्धा झळकली आहे. समोर आलेल्या माहितीनूसार पुनमने अनेक जाहीरातींमध्ये काम केल्याचं म्हटलं आहे. ती एका चित्रपटासाठी जवळपास एक कोटी रुपये मानधन स्वीकारत होती. सोशल मीडियावर पुनमची फॅन फॅालोइंग देखील जबरदस्त आहे. पुनमच्या अचानक जाण्याने तिचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.

पुनमचं खासगी आयुष्य

पुनम तिच्या प्रोफेशनल लाईफ बरोबरच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत  होती. 1 सप्टेंबर 2020 रोजी तिने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच तिने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सॅमवर तिने धमकी आणि मारहाणीचा आरोप केला होता. त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी सॅमला गोव्यातून अटक झाली होती.

पूनमला अनेकदा सार्वजनिक ठिकाणी बोल्ड कपड्यांमध्ये पाहिलं गेलंय. ट्रोलिंगला न जुमानता पूनम अनेकदा बोल्ड अंदाजात दिसायची. कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्येही ती दिसली होती.

News Title poonam pandey have crore rupees of property

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! एकनाथ शिंदे रूग्णालयात दाखल

समृद्धी महामार्गावर भयानक अपघात; बसची ट्रकला धडक,16 प्रवासी गंभीर जखमी

” तुम्ही ज्या शिवसेनेत शिकलात त्या इन्स्टिट्यूटचा मी सिनियर प्रोफेसर होतो”

‘बिग बॉस 17’चा विजेता Munawar Faruqui तुरुंगात जाणार?; नेमकं प्रकरण काय?

बजेटनंतर सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर