मोठी बातमी! एकनाथ शिंदे रूग्णालयात दाखल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde Surgery | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या कामात सतत व्यस्त असल्याचं अनेकदा पाहिलं आहे. ते राज्यभरात दौरे करत असताना कमालीचे व्यस्त असतात. काही दिवसांपासून त्यांच्या डोळ्याला अधिक त्रास जाणवू लागला होता. यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये आपल्या डोळ्याची शस्रक्रिया (Eye Surgery) केली आहे.

काही महिन्यांपासून एकनाथ शिंदेंच्या डोळ्याला अधिक त्रास जाणवू लागला होता. डॉक्टरांनी त्यांना लेझरच्यामाध्यमातून शस्रक्रिया करण्याबाबत सल्ला दिला. आपल्या नातवाचा वाढदिवस साजरा करत त्यांनी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी 9 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल होत शस्त्रक्रिया केली.

एकनाथ शिंदेंना आपल्या नातवासोबत अनेकदा पाहिलं आहे. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. अशातच गुरूवारी आपला नातू रूद्रांशचा वाढदिवस साजरा करत त्यानंतर ठाण्यातील माजीवाडा येथील एका प्रख्यात डॉक्टरांकडून आपल्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली. या शस्रक्रियेनंतर एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर आहे.

शस्रक्रियेचं कारण आलं समोर

एकनाथ शिंदे यांच्या चष्म्याचा नंबर बदलला असल्यानं त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला. त्यांना जवळचे अंधूक दिसू लागले होते. यामुळे त्यांना डॉक्टरांनी शस्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आजचे सर्वच कार्यक्रम रद्द केले आणि आपल्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली. यानंतर डॉक्टरांनी शिंदेंना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपल्या नातवाच्या वाढदिवसानंतर शस्रक्रिया केली. एकाच महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या घरी तीन वाढदिवस साजरे होताना दिसणार आहेत. त्यापैकी आपल्या नातवाचा वाढदिवस 1 फेब्रुवारी दिवशी साजरा करण्यात आला. त्यानंतर मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस चार फेब्रुवारी दिवशी असतो. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस 9 फेब्रुवारी दिवशी आहे. असे तीन वाढदिवस एकाच महिन्यात आले आहेत. यामुळे ठाण्यात बॅनरबाजी होताना दिसतेय.

ठाण्यात बॅनरबाजी

एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे दोघांचे वाढदिवस एकाच महिन्यामध्ये आहेत. यामुळे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘आमची निष्ठा कालपण ईथेच होती, आजही इथेच आहे आणि उद्याही इथेच राहिल;, अशा आशयाचे बॅनर शहरामध्ये झळकत आहेत.

News Title – eknath shinde eye surgery

महत्त्वाच्या बातम्या

बजेटनंतर सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

मृत्यूनंतर पुनम पांडेच्या वैवाहिक आयुष्याबाबत झाला सर्वात मोठा खुलासा!

पूनम पांडेला नेमका कोणता आजार झाला होता?, मोठी माहिती आली समोर

‘…त्या दोघांपासून जीवाला धोका’; स्वाती मोहोळचा खळबळजनक दावा

पूनम पांडेचा झाला मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर