समृद्धी महामार्गावर भयानक अपघात; बसची ट्रकला धडक,16 प्रवासी गंभीर जखमी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Samrudhhi Highway Accident | समृद्धी महामार्गावरील अपघातसत्र थांबण्याचं काही नाव घेईना. 1 फेब्रुवारी रात्री दोन वाजता एका लक्झरी बसने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 16 प्रवासी गंभीर जखमी (Samrudhhi Highway Accident) झाले आहेत. ही घटना वाशिम जवळ घडली आहे.

वाशिम जवळील कारंजा दोनद मार्गावर हा भीषण अपघात घडला आहे. लक्झरी बसने भरधाव येत ट्रकला धडक दिली. याचा वेग इतका जास्त होता की, बसचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. बसमधील प्रवासी यामुळे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताचं कारण समोर

समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway Accident) अचानकच समोर नीलगाय आल्याने ट्रक चालकाने ब्रेक दाबल्याचे म्हटले जात आहे. अचानक ब्रेक लागल्यामुळे मागून भरधाव येणारी बस जोरात या ट्रकला जाऊन धडकली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रवासी जखमी झाले आहेत.

ही बस नागपूरवरून पुण्याला जात होती. मात्र, मध्येच अपघात झाल्याने प्रवासी प्रचंड घाबरले आहेत.बसमध्ये जवळपास 40 प्रवासी असल्याचे म्हटले जात आहे. यापैकी 16 प्रवासी जखमी झाले आहेत. याची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

आपघातातील सर्व जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्वरित या ठिकाणी जाऊन जखमींना उपचारासाठी पाठवले. ट्रक चालकाने नीलगायला वाचवण्यासाठी जोरदार ब्रेक मारून ट्रक रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे मागून येणाऱ्या बसचा चक्काचूर झाला.

समृद्धीवर अपघातसत्र सुरूच

समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway Accident) आतापर्यंत गंभीर अपघातामध्ये 368 जणांनी आपला जीव गमावला आहे. सर्वाधिक अपघात हे मध्यरात्रीच घडले आहेत. काही दिवसांपूर्वीच यावर एक अपघात घडला होता. त्यात 17 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रवासी या मार्गावरून जाण्यास भीत आहेत.

News Title- Samrudhhi Highway Accident

महत्त्वाच्या बातम्या –

IPL की PSL जगातील सर्वात बेस्ट ट्वेंटी-20 लीग कोणती? Babar Azam चा चाहत्यांसोबत संवाद

बिल्डरांच्या मनमानीला चाप लागणार, सर्वसामान्यांसाठी म्हाडाचा मोठा निर्णय!

“आरक्षण घ्यायची मनोज जरांगे पाटील यांची औकात नाही”

Maratha Reservation: मराठा समाजाविरोधात कोर्टात धाव घेतलेल्या ओबीसी संघटनांना मोठा झटका

‘तू आमदार तुझ्या घरी, पाय उखडून टाकायला कार्यकर्ते….’; रूपाली पाटील भडकल्या