“तुम्ही ज्या शिवसेनेत शिकलात त्या इन्स्टिट्यूटचा मी सिनियर प्रोफेसर होतो”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhagan Bhujbal | काही दिवसांपासून अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  हे चांगलेच चर्चेत आहेत. सध्या ते भाजपच्या वाटेवर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता ते आणखी एका कारणानं चर्चेत आले आहेत. भुजबळ यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांना लाथ घालून मंत्रीमंडळातून हकलून द्या, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यामुळे आता छगन भुजबळ यांनी गायकवाडांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांना मंत्रीमंडळातून लाथा मारून बाहेर काढा, असं वादग्रस्त वक्तव्य केलं. यावेळी भुजबळ यांनी संजय गायकवाड यांना चांगलंच सुनावलं आहे. ज्या शिवसेनेत शिकलात त्या इन्स्टीट्यूटचा सिनियर प्रोफेसर होतो, असं म्हणत भुजबळांनी संजय गायकवाड यांना धारेवर धरलं.

काय म्हणाले छगन भुजबळ?

संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांना लाथ मारून हकलून द्या, असं वादग्रस्त वक्तव केलं आहे. यावर छगन भुजबळ उत्तरले आहेत. “ज्या शिवसेनेत शिकलात त्या इन्स्टीट्यूटचा सिनियर प्रोफेसर होतो. भाषा जरा जपून वापरायला पाहिजे”, अशा कडक शब्दात भुजबळ यांनी टीकेची तोफ डागली आहे.

“मला मंत्रीमंडळात ठेवायचं की नाही हे एकनाथ शिंदे ठरवतील”

मला वापरलेल्या भाषेवर त्यांचे नेते एकनाथ शिंदे निर्णय घेतील. कंबरेत लाथ मारून बाहेर काढा अशी भाषा वापरली. मला मंत्रीमंडळामध्ये घ्यायचं की बाहेर काढायचं याबाबतचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना आहे, तो मला मान्य आहे, असं भुजबळ म्हणाले.

“आनंद दिघे आणि इतर नेत्यांचा नेता म्हणून काम केलंय”

संजय गायकवाड यांनी केलेलं वक्तव्य छगन भुजबळांच्या जिव्हारी लागलं आहे. यावर त्यांनी “तुम्ही आनंद दिघेंना गुरू मानता त्यांचा आणि इतर नेत्यांचा नेता म्हणून मी काम केलं आहे. यामुळे अशा प्रकारची लाथ-बिथ भाषा वापरणं हे योग्य नाही”, असं म्हणत भुजबळांनी संजय गायकवाड यांचे कान टोचले आहेत.

काय म्हणाले संजय गायकवाड?

मराठा आरक्षणावरून संजय गायकवाड हे छगन भुजबळांवर आक्रमक झाले होते. भुजबळ यांचा ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत विरोध असल्यानं संजय गायकवाड यांनी भुजबळांना मंत्रीमंडळातून हकलून द्या, असं आवाहन संजय गायकवाड यांनी केलं आहे. “एखाद्या समाजाविरोधात मंत्र्याची भूमिका असू शकत नाही. भुजबळांमध्ये जातीयवाद शिरला असेल तर ते मंत्रीपदावर राहायच्या लायकीचे नाहीत. त्यांना ताबडतोब घरचा रस्ता दाखवा”, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं आहे.

News Title – Chhagan Bhujbal sanjay gaikwad controversy

महत्त्वाच्या बातम्या

शरद मोहोळच्या हत्येनंतर पत्नी स्वाती मोहोळचा धक्कादायक दावा!

पूनम पांडेचा झाला मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

IPL की PSL जगातील सर्वात बेस्ट ट्वेंटी-20 लीग कोणती? Babar Azam चा चाहत्यांसोबत संवाद

बिल्डरांच्या मनमानीला चाप लागणार, सर्वसामान्यांसाठी म्हाडाचा मोठा निर्णय!

“आरक्षण घ्यायची मनोज जरांगे पाटील यांची औकात नाही”