‘बिग बॉस 17’चा विजेता Munawar Faruqui तुरुंगात जाणार?; नेमकं प्रकरण काय?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Munawar Faruqui | डोंगरीच्या मूनव्वर फारुकी (Munawar Faruqui ) याने बिग बॉस 17 चा विजेता होत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. बिग बॉसमध्ये सामील होताच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललं गेलं. मात्र चाहत्यांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. म्हणूनच तो बिग बॉसच्या फिनालेपर्यंत गेला. बिग बॉसच्या ट्रॉफीसह त्याला मोठी रक्कमही मिळाली आहे.

मात्र, सध्या मुनव्वर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. एका वादग्रस्त वक्तव्यामुळे मुनव्वरला थेट तुरंगवास मिळू शकतो. त्याच्यावर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. मुनव्वरने हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी त्याला तुरुंगवास मिळण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेश येथील इंदूरमध्ये एका स्टँड-अप कॉमेडी कार्यक्रमात मुनव्वरने (Munawar Faruqui) हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. तेव्हा इंदूर मध्यवर्ती कारागृहात त्याला 35 दिवसांची शिक्षा देण्यात आली होती. पुढे 6 फेब्रुवारी 2021 रोजी त्याची सुटकाही झाली. मुनव्वरने तेव्हा जामिनाची मागणी केली होती. म्हणून त्याची सुटका झाली.

मात्र,आता त्याच्याविरोधात न्यायालयामध्ये आरोपपत्र सादर केले तर त्याच्या अडचणी वाढू शकतात. या प्रकरणी तुकोगंज पोलीस ठाण्यात आरोपपत्र दाखल करणे अपेक्षित होते, मात्र याला उशीर झाल्याने मुनव्वरच्या अडचणी वाढल्या आहेत. मध्य प्रदेश सरकारच्या परवानगीनंतर मुनव्वरविरोधात फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

बिग बॉस जिंकून मुनव्वर जेव्हा डोंगरीमध्ये गेला, तेव्हाही त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. डोंगरीमध्ये मुनव्वरला पाहण्यासाठी एकच गर्दी जमली होती. येथे ड्रोनचा बेकायदेशीर वापर केल्याने त्याच्यावर FIR दाखल करण्यात आला. आता तो तीन वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणामुळे चर्चेत आला आहे.

मुनव्वर फरूकीचा आतापर्यंतचा प्रवास

मुनव्वर (Munawar Faruqui) तसा गुजरातचा राहणारा. त्याने गुजरातमधील जुनागड येथे आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. वडिलांनी घेतलेल्या कर्जामुळे त्याला लहान वयातच शिक्षण सोडून काम करण्याची वेळ आली. त्यामुळे त्याला पाचवीनंतर शाळा सोडावी लागली होती. त्याची आई आणि आजी आई आणि आजी उत्तम समोसे बनवायची. त्यामुळे मूनव्वर एक स्टॉल लावून समोसे विकायचा.

पुढे त्याने आपले शिक्षण पूर्ण केलं. मुंबईत येऊन त्याने एका गिफ्ट शॉपमध्ये काम केलं. त्याने ग्राफिक डिझायनिंगचाही कोर्स केला होता. पुढे त्याने ग्राफिक डिझायनर म्हणून देखील काम केलं. सोशल मिडियावर तो नंतर स्टँड अप कॉमेडीयन म्हणून प्रचलित होऊ लागला. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

News Title-  Munawar Faruqui likely to be arrested

महत्त्वाच्या बातम्या –

Rain Update: पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालणार!, राज्याच्या ‘या’ भागांना पावसाचा इशारा

Maratha Reservation: सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही!, राज्य शासनाची विनंती मागासवर्ग आयोगाने फेटाळली!

Pune News: दरवाजाबाहेर चावी लपवून ठेवत असाल तर सावधान!, पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

Chhagan Bhujbal | “छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर?, भाजपवाल्यांनो… कुठं फेडाल हे पाप?”, एका पोस्टमुळे मोठी खळबळ

‘त्या भुजबळच्या… लई माज आलाय त्याला’, आमदाराची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ