‘त्या भुजबळच्या… लई माज आलाय त्याला’, आमदाराची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ

Sanjay Gaikwad | महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. त्यातच मंत्री छगन भुजबळ हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टिका करतात तर कधी आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळ आक्रमक झालेले आहेत, त्यामुळे भुजबळांना सध्या मराठा समाजाच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. मात्र, हे सुरु असताना दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील भुजबळांवर चांगलाच निशाणा साधला आहे. एवढंच नाही तर गायकवाडांची भुजबळांविरोधात बोलत असतानाची एक ऑडियो क्लिप देखील व्हायरल झाली आहे.

नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र सरकारने मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य केल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनोज जरांगे यांच्या सगेसोयरेबाबतच्या मागण्यांवर भुजबळ यांनी आक्षेप घेतलाय. त्यामुळे अनेकांनी भुजबळांना राजीनामा देण्यासाठी सांगितलं आहे. मात्र, सध्या चर्चा आहे ती आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या ऑडियो क्लिपची.

काय म्हणाले गायकवाड?

व्हायरल होत असलेल्या ऑडियो क्लिपमध्ये संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छगन भुजबळांची पक्षातून हकालपट्टी करावी, या शिवाय गायकवाड म्हणाले की, “त्या भुजबळच्या.. माज आलाय त्याला. त्याचं .. काय म्हणणं आहे तुह्यावाले असं म्हणत संजय गायकवाड म्हणाले की “,  खानदानी ही खत्म करतो मी. त्यांच्या या वादग्रस्त टीकांवरुन राजकीय नेते प्रतिकिया देत आहेत.

भुजबळांची विषारी भूमिका-

महाराष्ट्रात बहुसंख्या असलेल्या मराठा समाजाला सापडलेल्या नोंदीनुसार आणि सगेसोयऱ्यांसह प्रमाणपत्र देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. पण मराठा आरक्षण विषयाच्या आमच्या मागणीपासूनच छगन भुजबळ यांनी तिरस्कारची विषारी भूमिका घेतली आहे. प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या बाबतींमध्ये अतिशय वाईट भूमिका घेऊन मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र कसे मिळणार नाही अशाच प्रकारचे प्रयत्न त्यांनी केले आहे.

आज राज्यामध्ये 54 लाख नोंदी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे मिळाल्या आहेत. जवळ जवळ 39 लाख लोकांना सर्टिफिकेट देण्यात आल्याचा सरकारचा दावा आहे. परंतु अशी प्रमाणपत्रं देऊ नये याकरता छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत.

News Title : mla sanjay gaikwad audio clip goes viral

महत्त्वाच्या बातम्या-

‘येत्या पाच वर्षात ग्रामीण भागात…’; सर्वसामान्य नागरिकांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

राज्याच्या राजकारणात मोठी खलबतं, छत्रपती संभाजीराजे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केला फोन नंबर, ‘हे’ कारण आलं समोर

सह्याद्रीतील अनमोल रत्न, महाराष्ट्रातील ‘या’ किल्ल्यावर दिसते 7 रंगांची माती!

नॅशनल क्रश Tripti Dimri अडकणार लग्नबंधनात?; म्हणाली ‘माझा नवरा’…