अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केला फोन नंबर, ‘हे’ कारण आलं समोर

prajakta mali

Prajakta Mali | मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुण चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील जुळून येते रेशीमगाठ या मालिकेतून प्राजक्ताला घराघरातून प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियावर देखील प्राजक्ताची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्राजक्ताने लाखो लोकांच्या मनात घर केलं आहे. प्राजक्ताच्या चाहत्यांना नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं.

प्राजक्ताने केला फोन नंबर शेअर

प्राजक्ता देखील आपल्या चाहत्यांसाठी (Prajakta Mali) सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन फोटो शेअर करत असताना दिसत असते. मात्र, प्राजक्ताने चक्क तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन स्वतःचा फोन नंबर शेअर केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. इंस्टाग्राम स्टोरीवर व्हीडिओ शेअर केला आहे. या सोबतच तिने एक फोन नंबर शेअर केला आहे.

काय आहे नेमका प्रकार?

प्राजक्ताने शेअर केलेल्या (Prajakta Mali) व्हिडीओमध्ये ती श्लोक पठण स्पर्धेबद्दल बोलताना दिसत आहे. याचबरोबर तिने एक फोन नंबरही शेअर केला आहे आणि तिने तिच्या चाहत्यांना आवाहन केलं आहे की, ज्या कुणाला या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी दिलेल्या या नंबरवर कॉल करावा. सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग जास्त असल्यामुळे तिचे व्हिडीओ आणि फोटो लगेचच शेअर करत असतात. मात्र, प्राजक्ताची ही पोस्ट देखील चांगलीच व्हायरल झाली आहे. प्राजक्ता एक बबिझनेस वुमन आहे. प्राजक्ता राज असं तिच्या ब्रँडचं नाव आहे.

प्राजक्त राज काय आहे?

प्राजक्त राज या नावाचा तिचा दागिन्यांचा ब्रँण्ड आहे. अभिनयासोबतच प्राजक्ता एक उत्तम बिझनेस वुमन आहे. सोशल मीडियावर ती कायमच प्राजक्त राजचे व्हिडीओ शेअर करत असते. अनेकांनी तिच्या या बिझनेसला अवघ्या काही वेळातच भरभरुन प्रेम दिलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. प्राजक्ता माळी ही एक अशा अभिनेत्रीपैकी एक आहे जी सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

News Title : marathi actress prajakta mali shared the number

महत्त्वाच्या बातम्या

नॅशनल क्रश Tripti Dimri अडकणार लग्नबंधनात?; म्हणाली ‘माझा नवरा’…

Rashmika Mandanna | “तो माझ्या आयुष्यातला सर्वांत मोठा आधार…”, रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य

Sharad Mohol | शरद मोहोळ हत्येप्रकरणी मोठी बातमी समोर, अखेर खरा मास्टरमाईंड सापडला

Jackie Shroff | माधुरी दीक्षितसोबतच्या इंटिमेट सीनबद्दल जॅकी श्रॉफ यांचा मोठा खुलासा; म्हणाले..

Ramayana | रणबीर कपूर बनणार ‘राम’ तर सीतेच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .