Jackie Shroff | बॉलिवूडमध्ये ‘भिडू’ म्हणून प्रचलित असणारे अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आज 1 फेब्रुवारी रोजी आपला 67 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचं पूर्ण नाव जयकिशन कटू भाई श्रॉफ असं आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या चित्रपट आयुष्याबबत अनेक खुलासे केले.
यावेळी जॅकी श्रॉफ यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत दिलेल्या इंटिमेट सीनबद्दलही मोठा खुलासा केला. माधुरी आणि जॅकी श्रॉफ यांनी वर्दी, देवदास, खलनायक, टोटल धमाल अशा चित्रपटात सोबत काम केले आहे.
“..तेव्हा जॅकी श्रॉफ थरथरत होते”
नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांनी मोठा खुलासा केला. वर्दी चित्रपटासाठी त्यांचा आणि माधुरी दीक्षितचा एक किस सीन होता. यावेळी किस सीननंतर त्यांना अक्षरशः घाम फुटला होता. तर अभिनेत्री जुही चावलासोबतही त्यांनी आयना चित्रपटामध्ये एक इंटिमेट सीन दिला होता.
यावेळीही त्यांना प्रचंड भीती वाटत होती. माझ्यासाठी खरोखरंच हे दोन्ही सीन करणं खूप जास्त अवघड त्यांनी यावेळी सांगितलं. त्यांनी बऱ्याच अभिनेत्रींसोबत रोमान्स केला. पण माधुरीसोबत रोमान्स करताना मी थरथरलो, असं त्यांनी सांगितलं.
जॅकी श्रॉफ अनेक पुरस्कारांनी सन्मानित
जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांनी ‘हिरो’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी स्वामी दादा, कर्मा, रायम-लखन, गर्दिश, परिंदा, दहलीज, दूध का कर्ज, तेरी मेहेरबनियां, 1942 अ लव्ह स्टोरी, खलनायक या प्रसिद्ध चित्रपटात काम केलं. आपल्या अभिनयाने त्यांनी अनेकांच्या मनावर छाप सोडली.
यासोबतच आयना, देवदास, सौदागर, काश, त्रीदेव या चित्रपटातही ते झळकले आहेत. जॅकी श्रॉफ यांना परिंदा, 1942 अ लव्ह स्टोरी आणि रंगीला या चित्रपटांसाठी 3 वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले होतं की, मी कोणत्याही एका धर्माला मानत नाही. मी सर्वधर्म समभाव यावर विश्वास ठेवतो.
News Title- Jackie Shroff Big revelation about Madhuri Dixit
महत्वाच्या बातम्या-
Manoj Jarange | जरांगे पाटलांची थेट अर्थमंत्र्यांकडेच मोठी मागणी!
Gold Silver Rate | ग्राहकांना मोठा धक्का! सोन महागलं, जाणून घ्या दर
Union budget 2024 | अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर!
Budget 2024 | सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी; निर्मला सीतारमण यांची सर्वात मोठी घोषणा
Agriculture Budget 2024 | शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांकडून सर्वांत मोठ्या घोषणा !