Ramayana | रणबीर कपूर बनणार ‘राम’ तर सीतेच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

Ramayana | अयोध्येमध्य भव्य राम मंदीराचं उद्घाटन झालं आहे. तब्बल 500 वर्षांनी प्रभू राम आपल्या जन्मभूमीत परतले आहेत. अयोध्येत अजूनही भाविकांची राम रामलल्लाच्या दर्शनासाठी एकच गर्दी उसळत आहे. आता लवकरच प्रभू रामाचे (Ramayana) चरित्र मोठ्या पडद्यावरही दिसून येणार आहे.

नितेश तिवारी यांनी ‘रामायण’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटासाठी स्टारकास्टही निवडण्यात आली आहे. ‘अॅनिमल’ फेम रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यात प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सीतेच्या भूमिकेसाठी साऊथ अभिनेत्रीला घेण्यात आले आहे.

‘रामायण’ मध्ये दिसणार ‘हे’ कलाकार

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ (Ramayana) चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरू करण्यात येणार आहे. प्रभू राम, सीता, हनुमान आणि रावण यांची भूमिका कोण साकारणार याची माहिती समोर आली आहे. अभिनेता सनी देओल यात हनुमानाची भूमिका करणार आहे. तर, श्रीराम यांची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरचं नाव फिक्स करण्यात आलं आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट यात सीताची भूमिका करणार, असं म्हटलं जात होतं. मात्र आलिया नव्हे तर साऊथ स्टार अभिनेत्री साई पल्लवी (Actress Sai Pallavi) सीताची भूमिका करणार आहे. यात साई पल्लवीच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक मोठं नाव जुळणार आहे.

साऊथचा अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारणार आहे. य तगड्या कास्टसह नितेश तिवारी ‘रामायण’ चित्रपट घेऊन येत आहेत. त्यामुळे सर्वांनाच याची प्रतिक्षा असणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता. आता या चित्रपटकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

रामाच्या भूमिकेसाठी रणबीर घेतोय प्रचंड मेहनत

एकंदरीत रणबीर कपूर राम, (Ramayana)  साई पल्लवी सीता, सनी देओल हनुमान आणि विजय सेतुपती विभीषणाची भूमिका करणार आहे. आपल्या भूमिकेसाठी रणबीर कपूर प्रचंड मेहनत घेत असल्याचे म्हटले जात आहे. त्याने मांसाहार, मद्यपान आणि सिगारेट सोडून दिल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

News Title-  Ramayana movie cast decided

महत्त्वाच्या बातम्या –

Interim Budget 2024 | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

Jay Shah सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष; ACC चा मोठा निर्णय

Maratha resevation | ‘…तो अंतिम निर्णय नाही’; मराठा आरक्षणाबाबत भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

Pune News | पुण्याच्या पोलीस आयुक्तांची बदली, आता क्रिकेटपटूला दणका देणाऱ्या डॅशिंग अधिकाऱ्याकडे पुण्याचा कारभार

Budget 2024 | अर्थसंकल्पाच्या दिवशी ‘या’ शेअर्सवर द्या लक्ष; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला