Jay Shah | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष बनले आहेत. त्यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. इंडोनेशिया येथील बालीमध्ये आशियाई क्रिकेट परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. जय शाह आगामी काळात आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती, ज्याला पूर्णविराम मिळाला आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी जय शाह यांच्या कार्यकाळाच्या विस्ताराचा प्रस्ताव दुसऱ्यांदा मांडला होता आणि नामांकनाला ACC च्या सर्व सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला होता. जय शाह यांनी जानेवारी 2021 मध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांच्याकडून ACC ची सूत्रे हाती घेतली, तेव्हा ते ACC अध्यक्ष म्हणून नियुक्त होणारे सर्वात तरुण अध्यक्ष बनले.
ACC चा मोठा निर्णय
बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या नेतृत्वाखाली ACC ने संपूर्ण आशियाई प्रदेशात क्रिकेटचा प्रचार आणि विकास करण्यात लक्षणीय प्रगती साधली आहे. ACC ने 2022 मध्ये ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये आणि 2023 मध्ये वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक यशस्वीरित्या आयोजित केले. जय शाह हे आशियाई क्रिकेट परिषदेचे सर्वात तरूण अध्यक्ष आहेत.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा म्हणाले की, जय शाह यांनी आशियाई क्रिकेट परिषदेला संपूर्ण आशियाई प्रदेशात क्रिकेटचा प्रचार आणि विकास करण्यासाठी चांगली प्रगती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जय शाह यांच्या मार्गदर्शनाखाली ACC ने बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांसारख्या क्रिकेटप्रेमी देशांमध्ये क्रिकेटला मदत होईल असे उपक्रम राबवले.
Jay Shah तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष
सर्वांचे आभार मानताना जय शाह यांनी सांगितले की, आशियाई क्रिकेट परिषदेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. खेळाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहिले पाहिजे आणि ज्या भागात क्रिकेट अजूनही तितकेसे पोहचले नाही त्यावर आम्ही विशेष लक्ष केंद्रित करत आहोत.
आशियाई क्रिकेट परिषद पुरूष आणि महिलांसाठी आशिया चषकाचे आयोजन करते. तसेच आशियाईतील युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी देखील स्पर्धेचे आयोजन करते. मागील तीन टर्म या परिषदेचे अध्यक्षपद बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे आहे.
News Title- Jay Shah has become the president of the Asian Cricket Council for the third time in a row
महत्त्वाच्या बातम्या –
Budget 2024 | अर्थसंकल्पाच्या दिवशी ‘या’ शेअर्सवर द्या लक्ष; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
Paytm वापरत असाल तर सावधान!, RBIने या व्यवहारांवर घातली बंदी
Amitabh Bachchan: श्रीदेवीचा होकार मिळावा म्हणून अमिताभ यांनी उधळली होती ट्रकभर गुलाबाची फुलं
Cosmetic Clash: मेकअपच्या सामानावरुन सासू-सुनेत भांडण, सुनेनं उचललं धक्कादायक पाऊल