Pune News | पुण्याच्या पोलीस आयुक्तांची बदली, आता क्रिकेटपटूला दणका देणाऱ्या डॅशिंग अधिकाऱ्याकडे पुण्याचा कारभार

Pune News | लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या झाल्या आहेत. गृह विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले. त्यानुसार डीसीपी दर्जाच्या 63 अधिकाऱ्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर बढती देऊन नवीन पदे देण्यात आली आहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांची पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी तर रवींद्रकुमार सिंगल यांची नागपूर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्याचे विद्यमान पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना होमगार्डच्या महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. खरं तर वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूला घरचा रस्ता दाखवणाऱ्या अमितेश कुमार यांच्याकडे आता पुण्याचा कारभार असणार आहे. पुणे शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. ते 2020 पासून नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जागी आता नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून रितेश कुमार पदभार सांभाळतील. त्यांची होमगार्डचे महासमादेशक म्हणून बढती झाली आहे.

डॅशिंग अधिकाऱ्याकडे पुण्याचा कारभार

राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या करण्यात आल्या आहेत. पुण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे 1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी सर्वाधिक काळ नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले. ते या आधी 2007 मधील एका प्रकरणामुळे चर्चेत आले होते. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात क्रिकेटचा सामना सुरू असताना कॅरेबियन खेळाडू मरलोन सॅम्युअल आणि दाऊद इब्राहीमचा हस्तक मनोज कोचर यांच्यातील संवाद व्हायरल झाला होता.

अमितेश कुमार यांची या कामगिरीमुळे सर्वत्र चर्चा रंगली होती. त्यांनी नागपूरशिवाय छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त आणि मुंबई वाहतूक पोलीस शाखेचे सहआयुक्त म्हणूनही कारभार सांभाळला आहे. नागपूरचा कारभार सांभाळण्याआधी ते राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त होते.

Pune News पुण्याच्या पोलीस आयुक्तांची बदली

दरम्यान, पुण्याच्या पोलीस सह आयुक्तपदी प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते या आधी कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदी कार्यरत होते. तर, पंकज देशमुख यांना पुणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक करण्यात आले आहे. राज्य गुप्तवार्ता विभागामध्ये सहआयुक्त म्हणून निसार तांबोळी यांची नियुक्ती झाली आहे.

काही अधिकाऱ्यांची बदली तर काही अधिकाऱ्यांना बढतीचा फायदा झाला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त असलेल्या रितेश कुमार यांची होमगार्डचे महासमादेश म्हणून बढती झाली आहे. तसेच होमगार्डचे पोलीस महासंचालक असलेल्या प्रभात कुमार यांना नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्याचे संचालक बनवण्यात आले आहे. इतरही अधिकाऱ्यांना सरकारच्या या निर्णयामुळे बढती मिळाली आहे.

News Title- Senior IPS officer Amitesh Kumar has been appointed as the Police Commissioner of Pune
महत्त्वाच्या बातम्या –

Budget 2024 | अर्थसंकल्पाच्या दिवशी ‘या’ शेअर्सवर द्या लक्ष; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Paytm वापरत असाल तर सावधान!, RBIने या व्यवहारांवर घातली बंदी

Amitabh Bachchan: श्रीदेवीचा होकार मिळावा म्हणून अमिताभ यांनी उधळली होती ट्रकभर गुलाबाची फुलं

Cosmetic Clash: मेकअपच्या सामानावरुन सासू-सुनेत भांडण, सुनेनं उचललं धक्कादायक पाऊल

Nagpur News: नागपुरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा प्रकार, वासनांध शिक्षकाने…