Paytm वापरत असाल तर सावधान!, RBIने या व्यवहारांवर घातली बंदी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Paytm | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएमवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने (RBI) बुधवारी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला (PPBL) 29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही ग्राहकांच्या खात्यांमध्ये, प्रीपेड साधणे, वॉलेट आणि फास्टॅगमध्ये ठेवी किंवा टॉप-अप परवानगी देण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे पेटीएमवर ही कारवाई करण्यात आली असल्याचे आरबीआयने सांगितले.

RBIने या व्यवहारांवर घातली बंदी

आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएम फेब्रुवारी महिन्यानंतर बँकिंग सेवा देऊ शकणार नाही. कंपनीने नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे आरबीआयने सांगितले. मात्र ग्राहकांना त्यांचे पैसे काढण्याची मुभा देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली.

पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला ग्राहकांच्या खात्यांमध्ये फास्टॅगसारख्या प्रीपेड साधनांमध्ये ठेवी स्वीकारण्यास किंवा क्रेडीट व्यवहार करण्यास परवानगी देण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. ग्राहकांना त्यांच्या अकाउंटमधील शिल्लक रक्कम कोणत्याही निर्बंधाशिवाय काढता येणार आहे, असेही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले.

Paytm वापरत असाल तर सावधान!

दरम्यान, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडविरूद्धची आरबीआयची ही कारवाई बाह्य लेखापरीक्षकांनी तयार केलेल्या सर्वसमावेशक प्रणाली लेखापरीक्षण अहवालानंतर करण्यात आली आहे. आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, या अहवालांतून बँकेतील नियमांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आणि त्यामुळे पुढील कारवाई करणे आवश्यक आहे.

तसेच पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला ग्राहकांच्या खात्यांमध्ये ठेवी स्वीकारण्यास परवानगी देण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. RBI ने असेही म्हटले आहे की पेटीएम पेमेंट्स बँकेचे विद्यमान ग्राहक बचत खाते, चालू खाते, प्रीपेड साधने, फास्टॅग, नॅशनल किंवा कॉमन मोबिलिटी कार्डमध्ये ठेवलेले पैसे कोणत्याही निर्बंधाशिवाय वापरू शकतील.

याशिवाय बचत बँक खाती, चालू खाती, प्रीपेड साधने, फास्टॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड यासह त्यांच्या खात्यांमधून शिल्लक रक्कम काढण्याची किंवा वापरण्याची परवानगी विद्यमान ग्राहकांना कोणत्याही निर्बंधांशिवाय दिली जावी, असेही आरबीआयने स्पष्ट केले.

News Title- Reserve Bank of India has taken a big action on Paytm
महत्त्वाच्या बातम्या –

Amitabh Bachchan: श्रीदेवीचा होकार मिळावा म्हणून अमिताभ यांनी उधळली होती ट्रकभर गुलाबाची फुलं

Cosmetic Clash: मेकअपच्या सामानावरुन सासू-सुनेत भांडण, सुनेनं उचललं धक्कादायक पाऊल

Nagpur News: नागपुरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा प्रकार, वासनांध शिक्षकाने…

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांकडून नवी घोषणा, तारीख सुद्धा केली जाहीर!

Kalyan News: मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांचं टेन्शन वाढलं, स्वतःच्या मतदारसंघातच पराभवाचा झटका बसणार?