Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांकडून नवी घोषणा, तारीख सुद्धा केली जाहीर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्याला सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवल्यानंतर मराठा समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचा इशारा दिला आहे. अलीकडेच जरांगे लाखो मराठा बांधवांना घेऊन राज्याच्या राजधानीत धडकले होते. मराठा आंदोलकांची वाढती संख्या पाहता सरकारच्या हालचालींना वेग आला.

मुंबईकडे कूच करू पाहणारे मराठे वाशी, नवी मुंबईत येताच सरकारने मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना काढली. मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंची आंदोलनस्थळी भेट घेऊन मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्या. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना जातप्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीत समावेश केला जाणार आहे.

जरांगे पाटलांकडून नवी घोषणा

याशिवाय ओबीसीत सामाविष्ट केलेल्या मराठा बांधवाच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांना देखील जातप्रमाणपत्र मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केले. सरकारच्या या घोषनेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि छगन भुजबळ यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. मग भुजबळ आणि जरांगे आमनेसामने आले असून आरोपांच्या फैऱ्या सुरू आहेत.

मनोज जरांगे म्हणाले की, सरकारने सगेसोयऱ्यांसदर्भात काढलेल्या अधिसूचनेबाबत कायदा करायला हवा. पुढच्या १५ दिवसांत विशेष अधिवेशन बोलावून हा कायदा पारित करून घ्यायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालेले नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

Manoj Jarange Patil यांचा इशारा

सरकारच्या दुटप्पी भूमिकेनंतर जरांगे यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी मंगळवारी सरकारला इशारा देताना सांगितले होते की, लगेच उद्यापासून या अधिसूचनेची अंमलबजावणी सुरू नाही केली तर मी १० फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलनाला बसेन. खरं तर अद्याप सरकारने याबाबत कोणतीही हालचाल केली नाही. जरांगेंनी बुधवारी देखील माध्यमांशी संवाद साधला अन् सरकारला पुन्हा इशारा दिला.

बुधवारी किल्ले रायगडावर जाऊन मनोज जरांगे यांनी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारने या कायद्याची अंमलबजावणी वेळेत केली नाही किंवा दबावामुळे जबाबदारी पार पाडली नाही तर पुन्हा अडचण वाढेल. समितीला मुदतवाढ दिली आहे पण समिती काम करत नाही. नोंदी मिळत नाहीत. ज्यांची कुणबी नोंद आढळली आहे त्यांना जात प्रमाणपत्र दिले पाहिजे. म्हणूनच मी १० फेब्रुवारीला आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

News Title- Manoj Jarange Patil has warned the state government that he will go on hunger strike again from February 10 on the issue of Maratha reservation
महत्त्वाच्या बातम्या –

Kalyan News: मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांचं टेन्शन वाढलं, स्वतःच्या मतदारसंघातच पराभवाचा झटका बसणार?

Shikhar Dhawan | लेकाच्या एका भेटीसाठी तरसतोय शिखर धवन, सर्वांसमोर सांगितलं दु:ख

‘बिग बॉस’ संपताच Ankita Lokhande ची खास पोस्ट, म्हणाली…

Benefits of milk | दुधाबरोबर हे ‘सात’ पदार्थ खाल्ल्याने मिळतील दुप्पट फायदे!

Pushkar Jog | “जात बघून मैत्री करणारा तू, तुला 2 लाथा आणि…”, पुष्करला ‘या’ अभिनेत्रीने सुनावलं