Shikhar Dhawan | लेकाच्या एका भेटीसाठी तरसतोय शिखर धवन, सर्वांसमोर सांगितलं दु:ख

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shikhar Dhawan | भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन (Shikhar Dhawan ) आपल्या वैयक्तिक आयुष्यात प्रचंड संघर्ष करत आहे. मात्र, तरीही त्याच्या चेहऱ्यावर कायम हास्याचे भाव असतात. मात्र आतील दुःख कधी कधी बहर निघतंच. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून शिखरला आपला मुलगा जोरावरला भेटता न आल्यामुळे तो अत्यंत व्याकुळ झाला आहे.

“जेव्हा नियतीला वाटेल आमची भेट व्हावी, तेव्हा..”

एका पॉडकास्टमध्ये शिखरने (Shikhar Dhawan) आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. शिखर धवनची पत्नी आयेशा मुखर्जीसोबत घटस्फोट झाला आहे. त्यामुळे धवन त्याच्या मुलाला भेटू शकत नाही. पॉडकास्टमध्ये त्याने याबाबत चर्चा केली. पाच महिने झाले मी माझ्या मुलाला बोललो नाही, असं त्याने सांगितलं. मी त्याला रोज मेसेज करतोय, माझे मेसेज तो वाचतोय की नाही हेसुद्धा माला माहिती नाहीये, अशी माहिती शिखरने या पॉडकास्टमध्ये सांगितली.

शिखरने डिसेंबरमध्ये मुलगा जोरावरच्या वाढदिवशी एक पोस्ट लिहिली होती. याबाबत त्याला पॉडकास्टमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. मी तेव्हा दुःखी नव्हतो. तेव्हा फक्त मी माझ्या भावना व्यक्त करत होतो. मी भावुक आहे, पण मी माझं प्रेम त्याच्यापर्यंत पोहोचवत आहे, असं शिखर म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

तसेच मी जर त्याच्या आठवणीत रडतोय, दुखी असेल तर माझी ही नेगेटीव्ह एनर्जी त्याच्यापर्यंत जाईल, मला त्याला ही नकारात्मकता नाही पाठवायची. मला फक्त त्याला प्रेम द्यायचं आहे. तो जिथे कुठे असेल त्याने आनंदी असावं. जेव्हा त्याचं मन असेल आणि जेव्हा नियती आम्हाला भेटवण्याचं ठरवेल तेव्हा तो स्वतः हून येईल, असं शिखर म्हणाला.

शिखर धवन मुलाच्या आठवणीने भावूक

शिखरचा (Shikhar Dhawan) मुलगा त्याच्या आईसोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहतोय. घटस्फोटानंतर शिखर त्याला फक्त दोनदा भेटला आहे. भेटण्यासाठी त्याला फक्त दोन तास मिळतात. मला त्याला भेटायचं आहे. त्याची गळाभेट करायची आहे. मी त्याच्यासाठी खूप दुःखी आहे, असं शिखर म्हणाला.

मी त्याला रोज मेसेज करत आहे. एका पिताच्या नात्याने मी माझं काम करत आहे. त्याची इच्छा होईल तेव्हा तो माझे मेसेज बघेल. तेव्हा त्याला कळेल त्याचे वडील त्याच्यावर खूप प्रेम करतात. त्याचे वडील त्याच्यापासून दुर राहून कोणत्या परिस्थितीतून गेले याची जाणीव एक दिवस होईल. तो पुन्हा माझ्याकडे परतेल, असं शिखर म्हणाला आहे.

News Title-  Shikhar Dhawan emotional for his son

महत्त्वाच्या बातम्या –

Maratha resevation | मराठा आरक्षणाविरोधात ओबीसींनी उचललं मोठं पाऊल!

Anil Babar passed away | मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन

“मला पटतं ते मी करतो लोक काय…”, तिसरं लग्न अन् Shoaib Malik नं अखेर सोडलं मौन

Accident | माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या गाडीचा अपघात; सुनेचा मृत्यू, माजी खासदार जखमी

Ram Mandir | 41 दिवस चालत गाठली अयोध्या; मुंबईच्या शबनमने व्यक्त केली ‘ही’ इच्छा