‘बिग बॉस’ संपताच Ankita Lokhande ची खास पोस्ट, म्हणाली…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन दोघेही ‘बिग बॉस 17’ मध्ये सहभागी झाले होते. बिग बॉसचा हा पर्व आता संपला आहे. मुनव्वर फारूकी याचा विजेता ठरला आहे. शो संपताच अंकिताने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले आहे.

‘पवित्र रिश्ता ते बिग बॉस’ पर्यंतचा प्रवास तीने व्हीडिओच्या स्वरूपात पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. हा व्हीडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. पवित्र रिश्तामध्ये ‘अर्चना’ची भूमिका ते अनेक चित्रपटांचा भाग बनलेली अंकिता आज यशाच्या उच्च शिखरावर आहे. तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही, कारण तीने स्वतः आपले नाव इंडस्ट्रीमध्ये कमावलं आहे.

अंकिताने मानले चाहत्यांचे आभार

माझा एक प्रवास पवित्र रिश्तापासून सुरु झाला होता. आता हा प्रवास आणखी जास्त आठवणीत राहणारा झाला आहे. त्याला कारण आहे, ‘रिश्तो वाली लडकी’ला तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे. माझं हरणं किंवा जिंकणं तितकं महत्वाचं नाही. जितकं तुमचं माझ्यावरचं प्रेम आणि विश्वास आहे. तुमच्या प्रेमानेत मला इथंपर्यंत पोहोचवलं आहे, असं अंकिता (Ankita Lokhande) म्हणाली आहे.

पुढे ती म्हणाली की, आयुष्यात चढ-उतार येत होते. काही निघून गेलं. काही थांबले. पण या सगळ्यात तुम्ही लोक माझ्या पाठीशी उभे राहिलात! मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि प्रेम केल्याबद्दल तुमच्यापैकी प्रत्येकाचे खूप खूप आभार. सर्व #AnkuHolics, आपण सर्वांनी केलेल्या प्रयत्नांसाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद हा शब्द अगदी लहान आहे. पण तुमच्यासाठी एक Virtual झप्पी!, अशी पोस्ट अंकिताने केली आहे.

यासोबतच अंकिताने ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खानचेही आभार मानले आहेत. तुमच्या गोड शब्दामुळे मी टिकून राहिले, यासाठी तुमचे आभार असं तीने म्हटलं. यासोबतच बिग बॉसच्या घरातील शेवटच्या दिवसाचे फोटोही अंकिताने (Ankita Lokhande ) पोस्ट केले आहेत.

‘बिग बॉस’मुळे चर्चेत होती अंकिता लोखंडे

यंदाचा बिग बॉसचा सीजन अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) तसेच मूनव्वर फारुकी यांच्यामुळे चांगलाच गाजला. अंकिता आणि विकी लग्नानंतर या शोमध्ये सहभागी झाले मात्र त्यांच्यातील प्रेम नव्हे तर वादच अधिक दिसून आले. अगदी पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरात त्यांच्यामध्ये अनेक वाद झाले. मात्र, यातून बाहेर पडताच त्यांनी आमच्यात सर्व काही ठीक असल्याचं म्हटलं. अंकिता बिग बॉसची पक्के दावेदार मानली जात होती. मात्र स्पर्धेत मुनव्वरने बाजी मारत सर्वांनाच धक्का दिला.

महत्त्वाच्या बातम्या –

Anil Babar passed away | मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन

“मला पटतं ते मी करतो लोक काय…”, तिसरं लग्न अन् Shoaib Malik नं अखेर सोडलं मौन

Accident | माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या गाडीचा अपघात; सुनेचा मृत्यू, माजी खासदार जखमी

Ram Mandir | 41 दिवस चालत गाठली अयोध्या; मुंबईच्या शबनमने व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Pakistan मध्ये निवडणूक रॅलीत बॉम्बस्फोट; इम्रान खान यांच्या पक्षाचे 4 जण ठार