Benefits of milk | लहानपणापासून आपल्याला आई दूध पिण्यास देते. बाळ जन्माला आले की त्याच्यासाठी आईचे दूध (Benefits of milk ) हे अमृतसारखे असते. मोठे होईपर्यंत त्याला सकाळी दूध हमखास पिण्यासाठी दिले जाते. बऱ्याचदा आपण रात्रीही दूध प्यायला प्रधान्य देतो. मात्र फक्त दूध पिण्यापेक्षा त्यात काही घटक टाकले तर शरीरास अधिक फायदे मिळतात.
आता हे पदार्थ कोणते आणि त्याचे प्रमाण किती असावे तसेच ते कधी पिले पाहिजे, याबाबत सर्व माहिती अगोदर जाणून घ्या. दुधामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. त्यात काही घटक टाकले तर ते अधिक पौष्टिक बनत असते. आता हे घटक कोणते, याची यादी खाली दिली आहे.
Benefits of milk | दुधासोबत ‘हे’ पदार्थ मिसळून प्या
मध- मधामध्ये अँटीऑक्सिडंटस, अँटीबॅक्टेरीयल आणि अँटीफंगल घटक असतात. या घटकांमुळे शरीराला खूप फायदा मिळतो. म्हणून, दुधासोबत मध टाकून पिले पाहिजे.
हळद- रात्रीला वृद्ध असो किंवा तरुण आपण हळदीचे दूध पित असतो. कारण, हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढून रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो. तसेच हळद ही जंतुनाशक आहे. हळद सर्दी आणि ताप यांसारख्या आजारांपासून बचाव करते. म्हणून दुधासोबत हळद टाकून पिणे लाभदायक ठरते.
दालचिनी – दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे रोगप्रतिकारकशक्तीला वाढवण्यास मदत करते. तसेच यामुळे वजन नियंत्रित राहते. म्हणून दूधात दालचिनी मिसळून प्यायल्याने शरीराची रोप्रतिकारक क्षमता सुधारते.
बदाम- ब्लड शुगरला नियंत्रित करते. तसेच मेंदूला निरोगी ठेवते. बदाममुळे व्हिटॅमिन-ई वाढते. त्यातच बदाम दुधामध्ये टाकून पिले तर त्वचा उजाळण्यास मदत होते. यासोबतच केसांसाठीदेखील ते फायदेशीर असते.
खजूर- खजूर हा पदार्थ दुधासोबत अत्यंत चविष्ट लागतो. म्हणूनच ईदच्या दिवशी शिरखुरमा बनवण्यासाठी याचा भरपूर वापर करण्यात येतो. खजूर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. याने मसल्स आणि शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी मदत होते. त्यामुळे दूधमध्ये खजूर मिसळून पिणे कधीही फायदेशीर ठरेल.
केशर- केशर तसे खूप महाग मिळते.मात्र, ते आरोग्यासाठी फायद्याचेही अधिक असते. केशरचा उपयोग कफ दूर करण्यासाठी, भूक वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि हिरड्यांच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो. यासोबतच केशर चमकदार त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. यामुळे सुरकुत्याही कमी होतात आणि चेहऱ्यावर बारीक रेषाही दिसत नाहीत. म्हणून दुधामध्ये केशर मिसळून पिले जाते.
वेलची (इलायची)– वेलचीचा सुगंध दुधाला अजूनच चविष्ट बनवतो. काही लोक जेवणानंतर सुद्धा वेलची खाणं पसंत करतात. वेलचीला माऊथफ्रेशनर म्हणूनही खाल्ले जाते. हीच वेलची दुधात मिसळून पिले तर शरीर मजबूर होते.
News Title- Benefits of milk
महत्त्वाच्या बातम्या-
Pushpa-2 Release Date | प्रतीक्षा संपली! अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ या दिवशी रिलीज होणार
Parambir Singh | परमबीर सिंग खंडणीप्रकरणी मोठी बातमी; सीबीआयचा अखेर खुलासा
Maratha resevation | मराठा आरक्षणाविरोधात ओबीसींनी उचललं मोठं पाऊल!
Anil Babar passed away | मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन