Pushpa-2 Release Date | प्रतीक्षा संपली! अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ या दिवशी रिलीज होणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pushpa-2 Release Date | साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या ‘पुष्पा 2’ (Pushpa 2 ) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. याच्या  पहिल्या पार्टने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. पहिल्या पार्टमधील त्याच्या भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारदेखील मिळाला आहे.

सध्या अभिनेत्री रश्मिका आणि अल्लू अर्जुन याचा दूसरा पार्ट ‘पुष्पा 2’ ची शूटिंग करत आहेत. शूटिंगदरम्यानचा त्याचा एक लुक व्हायरल होत आहे. अल्लू अर्जुनचा हा नवीन लुकमधील फोटो व्हायरल झाला आहे. अल्लू अर्जुनचा हा लुक पाहून चाहते चांगलेच चक्रावले आहेत. यावर नेटकरीही प्रचंड प्रतिक्रिया देत आहेत.

अल्लू अर्जुनचा नवीन लुक व्हायरल

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये अल्लू अर्जुनने साडी नेसलेली आहे. यापूर्वीही त्याचा असाच एक फोटो पुष्पाच्या निर्मात्यांनी पोस्ट केला होता. पुष्पा 2 (Pushpa 2) च्या पहिल्या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा तो लुक पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. आता पुन्हा एकदा त्याचा साडीमधील एक फोटो व्हायरल होत आहे.

चित्रपटाच्या फर्स्ट-लूक पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन एका महिलेच्या वेशात दिसला होता. तेव्हा अभिनेता ‘गंगम्मा तल्ली जथारा’ मध्ये सामील होणार असल्याचे म्हटले गेले. तिरुपतीमध्ये ‘गंगाम्मा तल्ली जथारा’ ही एक प्रचलित प्रथा आहे. दरवर्षी आठवडाभर हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी पुरुष स्त्रियांच्या वेशभूषा करतात आणि गंगम्माच्या रूपात दिसतात.

गंगम्मा ही देवी वाईट प्रवृत्तींचा नाश करणारी म्हटले जाते. अभिनेता अल्लू अर्जुन पुष्पा 2 मध्ये याच अवतारात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. कानात झुमके, गळ्यात सोन्याची दागिने तसेच लिंबूचा हार, लाल टिकली आणि काजळ असा अवतार घेत अल्लू अर्जुनचा पहिला लुक पोस्ट करण्यात आला होता. त्यामुळे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

‘या’ तारखेला रिलीज होणार पुष्पा 2

बहुचर्चित असा हा ‘पुष्पा 2’ (Pushpa 2 ) चित्रपट 15 ऑगस्ट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तामीळ, तेलुगू, हिंदी आणि इतर भाषेतही हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी 500 कोटींचे बजेट असल्याचे म्हटले जात आहे. याच्या पहिल्या पार्टने बरीच कमाई केली होती. आता चाहते याच्या दुसऱ्या पार्टची आतुरतेने वाट बघत आहेत.

News Title- Allu Arjun new look from Pushpa 2 goes viral
  

महत्त्वाच्या बातम्या –

Anil Babar passed away | मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन

“मला पटतं ते मी करतो लोक काय…”, तिसरं लग्न अन् Shoaib Malik नं अखेर सोडलं मौन

Accident | माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या गाडीचा अपघात; सुनेचा मृत्यू, माजी खासदार जखमी

Ram Mandir | 41 दिवस चालत गाठली अयोध्या; मुंबईच्या शबनमने व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Pakistan मध्ये निवडणूक रॅलीत बॉम्बस्फोट; इम्रान खान यांच्या पक्षाचे 4 जण ठार