“मला पटतं ते मी करतो लोक काय…”, तिसरं लग्न अन् Shoaib Malik नं अखेर सोडलं मौन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shoaib Malik | भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झापासून विभक्त होऊन शोएबने वेगळा संसार थाटला आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने 18 जानेवारी रोजी पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. लग्नानंतर दोन दिवसांनी या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करून सर्वांना धक्का दिला. सनासोबत लग्नाच्या घोषणेनंतर शोएबने त्याची दुसरी पत्नी सानिया मिर्झाला घटस्फोट दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

सानिया मिर्झापासून वेगळे झाल्यानंतर शोएब मलिकने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता बांगलादेश प्रीमिअर लीगमधून बाहेर पडल्यानंतर मलिकने या प्रकरणी भाष्य केले आहे. सना जावेदसोबतच्या लग्नानंतर शोएब मलिकला खूप ट्रोल करण्यात आले होते. या सर्व प्रकारानंतर शोएबने आता मौन सोडले आहे.

सानिया-शोएब विभक्त

टीकाकारांना प्रत्युत्तर देताना मलिकने विविध बाबींवर प्रकाश टाकला. शॅडो प्रोडक्शन पॉडकास्टवर बोलताना शोएबने सांगितले की, तुमचे मन तुम्हाला जे सांगेल तेच तुम्ही केले पाहिजे. लोक काय विचार करतील याचा विचार करू नये. याचा अजिबात विचार करू नये. लोक काय विचार करतील याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. त्यांचा विचार करत बसलो तर 10 वर्षे लागतील किंवा 20 वर्षेही कमी पडतील.

Shoaib Malik नं अखेर सोडलं मौन

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनी 2010 मध्ये लग्न केले होते. या जोडप्याला एक मुलगा असून त्याचे नाव इझहान आहे. घटस्फोटानंतर शोएब आणि सानिया आपल्या मुलाला एकत्र वाढवतील. सानिया मिर्झाच्या कुटुंबीयांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, टेनिस स्टारने तिच्या पतीपासून ‘खुला’ पद्धतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AK BUZZ (@akbuzzofficial)

 

एखादी महिला तिच्या सहमतीने पतीपासून वेगळे होत असेल तर त्याला खुला म्हणतात. शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नावर त्याच्या कुटुंबातील सदस्यही खूश नसल्याचीही माहिती समोर आली. त्याच्या तिसऱ्या लग्नाला कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. मात्र, त्याच्या लहान भावाने त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाबद्दल शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, शोएबने प्रतिक्रिया दिली असली तरी अद्याप सानिया मिर्झाने याप्रकरणी उघडपणे भाष्य केले नाही. शोएबची तिसरी पत्नी सना जावेद ही पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री आहे. तिचे देखील यापूर्वी लग्न झाले होते.

News Title- Pakistani cricketer Shoaib Malik has commented for the first time after his divorce from Sania Mirza and marriage to Sana Javed
महत्त्वाच्या बातम्या –

Accident | माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या गाडीचा अपघात; सुनेचा मृत्यू, माजी खासदार जखमी

Ram Mandir | 41 दिवस चालत गाठली अयोध्या; मुंबईच्या शबनमने व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Pakistan मध्ये निवडणूक रॅलीत बॉम्बस्फोट; इम्रान खान यांच्या पक्षाचे 4 जण ठार

Ashok Saraf यांचा ‘सर्वोच्च’ सन्मान! महाराष्ट्र भूषण जाहीर; CM शिंदेंची घोषणा

वर्ल्ड क्रिकेटचा कारभार Jay Shah यांच्याकडे? BCCI सचिव बड्या पदाच्या शर्यतीत!