Ashok Saraf यांचा ‘सर्वोच्च’ सन्मान! महाराष्ट्र भूषण जाहीर; CM शिंदेंची घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ashok Saraf | मंगळवारी महाराष्ट्र सरकारने एक मोठी घोषणा करत अभिनयाचे सम्राट अशोक सराफ यांना सर्वोच्च असलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या निर्णयानंतर सर्वच स्तरातून सरकारचे या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. मागील अनेक दशकांपासून हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

CM शिंदेंची मोठी घोषणा

आपल्या अप्रतिम अभिनय कौशल्याने अशोक सरांनी तमाम प्रेक्षकांना भुरळ घातली. इतरांना हसवण्याची शैलीच त्यांची ओळख सांगण्यासाठी पुरेसी आहे. कलाक्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या पुरस्कारासाठी त्यांचे नाव जाहीर करून त्यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री शिंदेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले, “ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले.”

 

Ashok Saraf यांचा ‘सर्वोच्च’ सन्मान

मुंबईत जन्मलेल्या अशोक सरांना लहानपणापासूनच नाटकाची आवड होती. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी व्यावसायिकपणे या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी काही संगीत नाटकांमध्येही काम केले आहे. त्यांनी थिएटरमध्ये खूप काम केले. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, जॅकी श्रॉफ आणि अजय देवगण यांच्यासोबतही काम केले आहे.

बँकेतील नोकरी अन्…

अशोक सराफ यांनी चित्रपटाच्या दुनियेत येण्यापूर्वी बँकेत नोकरी केली होती. त्यांना अभिनयाची खूप आवड होती, म्हणून त्यांनी बँकेची नोकरी सोडली आणि पूर्णवेळ या क्षेत्रात काम करायचे ठरवले. त्यांचा निर्णय योग्य ठरला. मराठी चित्रपटांसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्यांचा दबदबा होता. त्यांनी साकारलेल्या पात्रांच्या आठवणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.

दरम्यान, चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही अशोक सराफ यांनी काही वर्षे बँकेत काम केले. त्यांनी 1974 मध्ये पहिला चित्रपट केला आणि आजही मनोरंजनाच्या जगात ते सक्रिय आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे.

News Title- Chief Minister Eknath Shinde has announced Maharashtra Bhushan Award to veteran actor Ashok Saraf
महत्त्वाच्या बातम्या –

Vicky Jain | विकी जैनचा सुशांतबद्दल मोठा खुलासा; म्हणाला,”अंकिता आणि सुशांतमुळे..”

Manoj Jarange | सरकारचं टेंशन वाढलं, जरांगेंना संशय, पुन्हा केली मोठी घोषणा

Ashok Saraf | मोठी बातमी! अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर

Health Insurance असेल तर ही बातमी नक्की वाचा, आता होईल फायदाच फायदा

Jaya Bachchan | 50 वर्षांच्या संसारानंतर जया बच्चन यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या “लग्नानंतर…”