Jaya Bachchan | 50 वर्षांच्या संसारानंतर जया बच्चन यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या “लग्नानंतर…”

Jaya Bachchan | बच्चन कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. अमिताभ आणि जया बच्चन ( Jaya Bachchan) यांनी सुन ऐश्वर्या आणि मुलगा अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत होत्या. यावर त्यांच्या कुटुंबियांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसली, तरी त्यांच्यात वाद होत असल्याचे सतत बोलले जात आहे.

अशातच आता जया बच्चन यांनी अमिताभ यांच्यासोबत लग्न केल्यानंतर तब्बल 50 वर्षांनी वैवाहिक आयुष्याबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा होत आहे. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा तिच्या ‘व्हॉट द हेल, नव्या’ या पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. याच कार्यक्रमात जया बच्चन यांनी हे विधान केले आहे.

“लग्नानंतर रोमान्स खिडकीच्या बाहेर..”

‘व्हॉट द हेल नव्या’चा हा दुसरा सिझन असून यामध्ये जया बच्चन ( Jaya Bachchan) आणि श्वेता नंदा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. याच ठिकाणी जया यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या व्हिडीओत नव्या आजी जया यांना एक सवाल करते. “जयाईंग नावाचा एक शब्द आहे हे तुम्हाला माहितीये का?”, असा सवाल नव्याने केला. यावर जया बच्चन यांनी ‘ओहहहह?’ अशी हसतच प्रतिक्रिया दिली.

यानंतर नव्याने ‘जयाईंग’चा अर्थही सांगितला शिक्षिकेसारखं वागण्याला किंवा सतत दुसऱ्यांना सूचना देण्याला ‘जयाईंग’ म्हटलं जातं, असं नव्या म्हणाली. पुढे पॉडकास्टमध्ये सिक्रेट्स सेगमेंटमध्ये जया बच्चन यांना लग्नाबाबत प्रश्न करण्यात आला. यावर त्यांनी म्हटले की, ‘लग्नानंतर रोमान्स उरतच नाही.’, त्यांचे हेच वक्तव्य आता चर्चेत आलं आहे. लग्नानंतर रोमान्स खिडकीच्या बाहेर चालल्या जातो, असंही जया यांनी म्हटलं आहे.

‘व्हाट द हेल, नव्या 2’ चा प्रोमो रिलीज

दरम्यान, जया बच्चन ( Jaya Bachchan) यांची नात नव्या हीचा ‘व्हाट द हेल, नव्या 2’ चा प्रोमो रिलीज झाला असून यावर आता चाहत्यांच्या प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत. हा पॉडकास्ट 1 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. व्या नंदाच्या युट्यूब चॅनलवर तो प्रदर्शित करण्यात आला आहे.

यावर चाहते मजेशीर प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका युजरने म्हटलं की, ‘कमाल आहे, आता शोमध्ये इतर पाहुण्यांनाही बोलवा.’, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, ‘तिन्ही महिला असाधारण, सुंदर आणि बुद्धीमान आहेत.’ तर एका व्यक्तिने म्हटले की, ‘ शो मध्ये पुस्तके आणि लेखक यांच्यावर आधारित एक एपिसोड करा.’

News Title- Jaya Bachchan statement on marriage  

महत्त्वाच्या बातम्या –

Fruit seeds Disadvantages | ‘या’ फळांच्या बिया खाल्ल्याने ओढवू शकतो मृत्यू; आताच सतर्क व्हा

Petrol Diesel Price Today | राज्यात पेट्रोल-डिझेलचे भाव काय?, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

‘आजपर्यंत मी ज्या बायकांसोबत….’; Munawar Faruqui चं मोठं वक्तव्य

Sara Ali Khan पुन्हा पडली प्रेमात?, सर्वांसमोर केलं असं काही की….

Gold-Silver Price Today | सोने-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचे दर